बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. 2 जून रोजी केज(place)पोलीस स्टेशनमध्ये एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी नानासोबब चौरे हा वाल्मिक कराडचा चेला असल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण बीड हादरुन गेले आहे.

काल केज पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील मतिमंद मुलीवर नानासाहेब चौरे या नराधमाने बलात्कार केला. बळजबरी बलात्कार करताना पिडीतेच्या नात्यातील एका महिलेने पाहिले.(place) त्या महिलेने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी नानासाहेबाने महिलेला धमकी दिली. हा प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही अशी धमकी देऊन तो पळून गेला. यानंतर पिडीतेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नानासाहेब चौरे या आरोपीला रात्री पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी नानासाहेब चौरे यांनी वाल्मिक कराड याच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आता वाल्मिक कराडच्या या चेल्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने चर्चा सुरु झाली आहे. (place)या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी एका गतिमंद तरुणीवर वाल्मिक कराडच्या चेल्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही तरुणी एका रुग्णालयासमोर उभी होती. ती एकटी उभी असल्याचे पाहून या आरोपीने तिला आडोशाला नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केले. ही घटना तरुणीसोबत असलेल्या एका महिलेने पाहिली. तेव्हा आरोपीने त्या महिलेला कोणालाही याबद्दल न सांगण्याची धमकी दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान