साहेब, पाणी द्या मुलांची लग्नं जमत नाहीत बार्शीच्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक?

राज्यात दुष्काळसदृश स्थितीमुळे पिकं करपली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. बार्शीतील एका तरुणाने पाणीटंचाईमुळे मुलांची लग्नं जमत नसल्याची व्यथा मांडत, उजनी धरणातून पाणी देण्याची मागणी केली.

राज्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी अनेक पिकं करपली आहेत. (Devendra Fadnavis) त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोरही पाण्याचं मोठं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील विविध भागांचा दौरा करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.

फडणवीस यांनी धानोरे येथे पाण्याअभावी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या समस्या आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पाणीप्रश्नाचा मुद्दा एका तरुणाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत असताना समाधान शिंदे या तरुणाने त्यांच्याशी संवाद साधला. (Devendra Fadnavis) बार्शी तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असून, त्याचा परिणाम शेतीसोबतच सामाजिक जीवनावरही होत असल्याचं समाधान शिंदे यांनी सांगितलं. बार्शी तालुक्याला उजनी धरणातून पाणी देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

‘पाणी नसल्यामुळे मुलांची लग्नं जमत नाहीत’ “मुख्यमंत्री साहेब, बार्शीला पाणी नसल्यामुळे इथल्या मुलांची लग्नं जमत नाहीत,” अशी व्यथा समाधान शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पाण्याअभावी शेतीचं मोठं नुकसान होत असून, (Devendra Fadnavis) त्याचा परिणाम तरुणांच्या लग्नांवरही होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे बार्शी तालुक्यासाठी उजनी धरणातून शक्य तितकं पाणी वळवावं, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन त्या तरूणाचं म्हणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे ऐकलं आणि सर्व नागरिकांना आश्वस्त केलं. “ उजनीमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आणतोय. ते आलं की जसं तिकडच्या भागाला आपण पाणी दिलं, तसं इकडच्या भागालाही आपण पाणी देऊ. काळजी करू नका,” असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.

हेही वाचा : 

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?

विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा?