तमिळनाडू सरकार कोसळणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा राजकारणात खळबळ?

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, विजय यांचे सरकार लवकरच कोसळू शकते आणि राज्यात निवडणुका होऊ शकतात. मागच्या महिन्यात निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी एका सभेमध्ये वक्तव्य केले. तसेच राज्यात लवकरच निवडणुका होतील असेहि भाकीतही केले. स्टॅलिन म्हणाले, मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या टीव्हीके सरकारकडे बहुमत नाहीये आणि राज्यात पुढच्या तीन ते सहा महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुका होऊ शकतात. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारचे संख्याबळाचे गणितही स्पष्ट केले.

तामिळनाडू विधानसभा 234 सदस्यांची असून बहुमतासाठी किमान 118 जागा आवश्यक आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये TVK हा मोठा पक्षा असला तरी त्यांना फक्त 108 जागा मिळाल्या. त्यानंतर विजय यांनी कॉँग्रेस, IUML आणि VCK या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. स्टॅलिन यांनी यावर टीका करत म्हटले की, हे सरकार स्वतःच्या बळावर नाही तर इतर पक्षांच्या आधारावर टिकून आहे. कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश स्टॅलिन यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर द्रमुक कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. निवडणुका कधीही लागू शकतात. तीन महिन्यांत किंवा सहा महिन्यांतही लागू शकतात. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा असे ते म्हणाले. या भाषणादरम्यान स्टालिन यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि आर्थिक परिस्थितीवरही सरकारला घेरले. राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांत वाढ झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच अघोषित वीज कपात होत असून चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या उद्योगांनी राज्य सोडण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?