महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

 देशभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे वनसंपदेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः विल्सन पॉईंट परिसरात पर्यटकांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले असून, सूर्यास्तानंतर (Mahabaleshwar)या ठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी कठोर पावले महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण मानले जाते. मात्र, या परिसरातील मुख्य प्रेक्षणीय स्थळाव्यतिरिक्त असलेल्या कोअर वनक्षेत्रात काही पर्यटकांकडून अनुचित प्रकार होत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सातारा वन विभागाने त्या भागात प्रवेशावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.(Mahabaleshwar) वन अधिनियमांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक विल्सन पॉईंटवर गर्दी करतात. मात्र, सूर्यास्तानंतर अनेक जण तेथे थांबून मद्यपान, पार्ट्या आणि गोंधळ घालण्याचे प्रकार वाढल्याने वन्य परिसराला धोका निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, भेकवली यांनी सूर्यास्तानंतर हा परिसर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दिवशी सूर्योदयाच्या वेळीच प्रवेश सुरू केला जाणार असून, संध्याकाळी गेट बंद होण्यापूर्वी सर्व पर्यटकांनी आपली वाहने बाहेर काढणे बंधनकारक असेल.

ड्रोन, पाळीव प्राणी आणि प्लास्टिकवरही निर्बंध वन्यजीवांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने आणखी काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. वन्यप्राण्यांना संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पर्यटकांना पाळीव प्राणी सोबत आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच जंगल आणि दऱ्यांचे चित्रीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनमुळे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याने या परिसरात ड्रोन उडवण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ड्रोन वापरताना आढळल्यास ते तात्काळ जप्त केले जातील. (Mahabaleshwar)याशिवाय वन्यप्राण्यांना मानवी खाद्यपदार्थ देणे, परिसरात प्लास्टिकचा कचरा टाकणे किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. महाबळेश्वरच्या नैसर्गिक संपदेचे जतन करण्यासाठी सर्व पर्यटकांनी नियमांचे पालन करून वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?