“गोकुळ”च्या सत्ता संघर्षाचं कवित्व अजून संपलेलं नाही

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गोकुळ दूध संघाचे राजकारण पूर्वी कोल्हापूर जिल्हा मर्यादित होतं. स्थानिक नेते एकत्र यायचे. कॅनल जाहीर केली जायची. आणि संचालक मंडळाच्या निवडणुका व्हायच्या. दूध ग्राहक म्हणून सामान्य माणसापर्यंत ही निवडणूक कधी पोहोचली नव्हती. (politics) यंदा मात्र ती राष्ट्रीय पातळी पर्यंत गेली. राष्ट्रीय वृत्तपत्रांना, वृत्तसंस्थांना गोकुळ दूध संघाची दखल यंदा प्रथमच घ्यावी लागली. आता सत्ता संघर्ष जवळपास संपला असला तरी त्याचे कवित्व मात्र अजून संपलेले नाही. आता न्यायालयीन पातळीवर झालेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडला जाऊ लागला आहे. आणि या विषयाचं राजकीयीकरण झाल्याने राजकीय पक्षांचे प्रवक्ते आता त्यावर व्यक्त होऊ लागले आहेत.

गोकुळ दूध संघाची सत्ता सूत्रे काही राजकीय मंडळींच्या हातात असली तरी, तिथे एका मर्यादित पातळीपर्यंत राजकारण केले जायचे. (politics) मात्र गेल्या वर्षी महायुती सरकारने गोकुळ दूध संघात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर तेथे राजकारणाला उकळी फुटू लागली. निवडणुका आणि निवडणुकीनंतर गोकुळ दूध संघाचा विषय राष्ट्रीय पातळी पर्यंत जाऊन पोहोचला. अगदी देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी अर्थात राहुल गांधी यांनी गोकुळ च्या राजकारणावर भाष्य केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने सत्ता संघर्ष अगदी धारदार बनला. आणि नंतर काय घडले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महायुतीच्या वतीने माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर अध्यक्ष पदाचा दुग्धाभिषेक घातला गेल्यानंतर नव्या संचालक मंडळाने ग्राहकांना पहिला मोठा दणका दिला. यापूर्वी दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली जायची. नव्या अध्यक्षांनी एकदम सहा रुपयांची दरवाढ केली आहे. संघाचं आर्थिक व्यवस्थापन थोड्याफार प्रमाणात अडचणीत आलेलं असावं आणि त्याचा ठपका प्रशासक मंडळावर ठेवला गेला आहे.

गोकुळ दूध संघाचा सुद्धा संघर्ष न्यायालयापर्यंत पोहोचला. कोल्हापूर सर्किट बेंच ला दिवाळी सुट्टी असल्यामुळे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचीका दाखल केली. तिथे सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि समाविचारी आघाडीच्या वतीने ज्येष्ठविधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. आणि खंडपीठाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. आता न्यायालयीन लढाईत सरकारच्या तिजोरीतून ऐंशी लाख रुपये विधीज्ञ रोहतगी यांना शुल्क म्हणून देण्यात आले. त्याबद्दल आता सतेज पाटील यांनी आवाज उठवला आहे.एखाद्या वकिलाला सरकारकडून इतकी प्रचंड फी द्यावी लागते याबद्दल सामान्य माणूस चक्रावून गेला आहे.

सतेज पाटील यांनी यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी तोंड उघडले आहे. सतेज पाटील यांनी अभिषेक मनु सिंघवी या वकिलांना नवी दिल्ली येथून छत्रपती संभाजी नगर मध्ये खास चार्टर विमानाने आणले होते. (politics) त्यांनी सुद्धा खंडपीठात युक्तिवाद करण्यासाठी त्यांच्या वकिलांवर सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत असा पलटवार बन यांनी केला आहे. गोकुळ दूध संघाच्या सत्ता संघर्षावर दोन्ही बाजूंनी न्यायालयात त्यांच्या वकिलांवर भरपूर पैसा उधळला आहे हे आता दोन्ही बाजूंनी परस्परांवर टीका टिपणी सुरू झाल्यानंतर सामान्य जनतेला समजून आले आहे. गोकुळ दूध संघाचा एकूण अर्थकारण अप्रत्यक्षपणे या निमित्ताने सामान्य माणसासाठी चर्चेचा विषय बनले आहे.सतेज पाटील यांनी गोकुळ केसरी या कुस्ती स्पर्धेसाठी सव्वा कोटी रुपयांची उधळण केली असा आरोप त्यांच्यावर केला जाऊ लागला आहे. गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा तसेच दहीहंडी यावर झालेल्या किंवा होत असलेल्या खर्चाबद्दल विरोधकांनी सुद्धा कधी सवाल उपस्थित केले नव्हते आणि नाहीत. आता मात्र त्यावरही चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाचं पूर्णपणे राजकीयीकरण झाले आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट