कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
समृद्धी महामार्ग हा एकनाथ शिंदे यांचा ते मुख्यमंत्री असतानाचा ड्रीम रोड प्रोजेक्ट होय. या महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. तो रहदारीसाठी समारंभपूर्वक खुला करण्यात आल्यानंतर तो फेटल एक्सीडेंटसाठी म्हणून चर्चेत आला. आता या महामार्गावर वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. परिणामी रात्री या महामार्गावरून जाण्याचे धाडस वाहन चालकांच्या कडून केले जात नाही. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मदत केंद्र या महामार्गावर असून नसल्यासारखे आहे. (Eknath Shinde) त्यामुळे गुन्हेगारांना इथे मोकळे रान मिळते आहे.

तीन वर्षांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. नागपूर ते मुंबई असा हा 701 किलोमीटरचा महामार्ग असून आठ तासात प्रवास पूर्ण होतो. दोनच दिवसापूर्वी खिळे असलेले ठोकळे रस्त्यावर टाकून एका वाहनाची दोन चाके पंक्चर करण्यात आली. सौरभ चौगुले हे पत्नी आणि मुलांसह या महामार्गावरून प्रवास करत होते. (Eknath Shinde) त्यांचे वाहन टायर पंक्चर झाल्यामुळे थांबले. आणि दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तसेच पैसे लुटून ते फरार झाले. एका भयानक वास्तवाला सामोरे गेलेले चौगुले कुटुंब चांगलेच भयभीत झाले होते. धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करायचे, वाहन थांबले की प्रवाशांना लुटायचे असे वाटमारी चे, 15 घटना गेल्या काही महिन्यात या महामार्गावर घडलेल्या आहेत. त्यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
सुमारे सातशे किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मदत केंद्र ही पोलिसांची यंत्रणा या महामार्गावर आहे पण अपघात ग्रस्त ठिकाणी मदत केंद्राचे पोलीस तातडीने पोहोचलेले आहेत असे घडलेले नाही. अशा प्रकारच्या महामार्गावर कोणत्याही कारणांसाठी वाहन थांबवायचे नाही असा नियम आहे. (Eknath Shinde) त्यामुळे रस्त्यावरील “अर्थ “कारण इथे केले जात नाही. पण वाहतूक मदत केंद्र म्हणून पोलिसांची काही जबाबदारी असते. तातडीच्या मदतीसाठी पोलिसांनी मोबाईल क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी दिसेल अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. पण जिथे एखादी घटना घडते तिथे हा क्रमांक असतोच असे नाही. वाहन चालकांनी सुद्धा पोलिसांनी दिलेले क्रमांक आपल्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवणे आवश्यक आहे.
गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाटमारी प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी ठोस उपाय योजना करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत.महामार्गावर वाटमारी करणाऱ्या गुन्हेगारांच्या काही टोळ्या आहेत. या टोळ्या जिल्हा तसेच राज्य महामार्गावर सुद्धा सक्रिय असतात. गुन्हा करण्याच्या त्यांच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची टायर्स पंक्चर करण्याचा प्रकार महा भयानक आहे. वाहनाचा अपघात होऊ शकतो. त्यात जीवित आणि होऊ शकते. आणि म्हणूनच असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लांब पल्ल्याच्या महामार्गावर ठराविक किलोमीटर अंतरावर पोलीस चौकी असली पाहिजे. तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडे मोटर सायकल तसेच पोलीस वाहन असले पाहिजे. संदेशवहन यंत्रणा प्रभावी असणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांना लुटण्याचा गुन्हा घडलेला आहे तेथील अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. महामार्गावरील वाटमारी गुन्हे जलद गतीने उघडकिस आणले गेले तरच अशा गुन्ह्यांना पायबंध बसेल. भयमुक्त वातावरणात महामार्गावरील प्रवास होईल.
समृद्धी महामार्गावर गावे आतील भागात आहेत. महामार्गावर ती पाहायला मिळत नाहीत. ग्रामस्थांची तातडीची मदत मिळेल याची शक्यता कमी. म्हणूनच अशा महामार्गांवर पोलीस यंत्रणा सक्रिय असली पाहिजे. पूर्वी या समृद्धी महामार्गावर दररोज कुठे ना कुठेतरी फेटल एक्सीडेंट व्हायचे. जीवित हानी व्हायची. प्रामुख्याने टायर फुटी मुळे हे अपघात व्हायचे. या महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र अनेक ठिकाणी आहे. त्याला ब्लॅक स्पॉट म्हणतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेला हा राष्ट्रीय महामार्ग कमालीच्या पातळीवर प्रवाशांसाठी अति सुरक्षित असला पाहिजे. ही जबाबदारी शासनाची आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?