“शिंदे म्हणतात मार्ग काढू, किती मार्ग काढले, किती चर्चा केल्या. ज्यूनियर मंत्री पाठवता चर्चा करता हा विषय इतका लहान आहे का?. तुम्ही गांभीर्याने या विषयावर चर्चा केली पाहिजे. जरांगे पाटील मांडत असलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. वरवर उत्तरं देता”

“मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढतायत. सतत उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. मध्यंतरी मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं सारखी, सारखी उपोषण करु नका. त्यांना सांगितलं प्रकृतीची वाट लावून घेऊ नका. (Sanjay Raut) अशावेळी मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, वातावरण तापलेलं असताना परभणीचे खासदार त्यांनी मेळावा घेतला. डेप्युटी सीएमला बोलावलं, तो टाळावा अशी जरांगे पाटील यांची भूमिका होती. त्यांची ती तळमळ, तडफड मी सुद्धा पाहिली” असं संजय राऊत म्हणाले. परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांनी काल शेतकरी मेळावा घेतला. (Sanjay Raut) त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं. हा मेळाला रद्द करा असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. पण बंडू जाधव यांनी मेळावा घेतला. त्यावर संजय राऊत बोलत होते.
“खासदार संजय बंडू जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी जरांगे पाटलांची फार मोठी मदत झाली, हे सत्य आहे. (Sanjay Raut) त्यांनी जर ती अपेक्षा केली असेल, तर त्यांनी तो त्याग करायला पाहजे होता. पण बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष ठाकरेंकडे सत्ता भोगल्यानंतर ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, सर्व पदं भोगली. ते आता आमच्या मनोजदादा जरांगेंचे कसे होतील? ते नवनवीन आई-बाप शोधत असतात. आता त्यांच्या मध्ये काय होतय ते पाहू, हा त्यांचा अंतर्गत लढा आहे. मी वारंवार सांगतोय उपोषणाचा विषय नेत्याच्या प्रकृतीला त्रासदायक असतो हे जंतरमंतरने पाहिलय” असं राऊत म्हणाले.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?