पेन्शनचा नवीन फॉर्म्युला! 30 वर्षांनंतर किती मिळणार पैसे

NPS ट्रस्टने युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) कॅल्क्युलेटर लाँच केले आहे. UPS कॅल्क्युलेटर NPS ट्रस्टच्या वेबसाइटवर युनिफाइड पेन्शन स्कीम कॅल्क्युलेटर म्हणून पाहता येईल. यानंतर आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य योजना निवडा जेणेकरून निवृत्तीनंतर तुमच्या पैशाची अडचण भासणार नाही. नवीन कॅल्क्युलेटर दोन्ही योजनांचे अंदाजे फायदे एकत्रितपणे दर्शवितो, जेणेकरून कर्मचारी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील. येथे संपूर्ण गणना जाणून घ्या आणि तुम्हाला जास्त पेन्शन कुठे मिळेल? पाहा

UPS की NPS, कोणती योजना फायद्याची?
NPS पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन प्रणाली म्हणजे OPS लागू करण्याची केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती. कर्मचाऱ्यांच्या या मागणीला उपाय म्हणून सरकार UPS योजना घेऊन आली. सरकारी कर्मचाऱ्यांना UPS आणि NPS पैकी एका योजनेची निवड करायचा पर्याय मिळेल त्यामुळे, निवृत्तीच्या उद्दिष्टाने तुमच्यासाठी कोणती योजना फायदेशीर आहे आधी माहिती करून घ्या.

UPS म्हणजे काय?
निवृत्तीनंतर निश्चित मासिक पेन्शन हवी असलेल्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचे UPS चे उद्दिष्ट आहे. तसेच एक निश्चित एकरकमी रक्कम आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला बाजारातील चढ-उतारांच्या जोखमीपासून सुरक्षित ठेवते. दुसरीकडे, NPS मधील परतावा पूर्णपणे गुंतवणुकीच्या कामगिरीवर अवलंबून असतो तर, UPS मध्ये मासिक पेन्शन निश्चित असेल पण, एकूण लाभ देखील मर्यादित असू शकतो.