डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जगाचे टेन्शन वाढवले. डोनाल्ड ट्रम्प इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. सध्या अमेरिकेत निवडणुका असल्याने ते शांत बसले आहेत. एकदा निवडणुका झाल्या की, (Donald Trump) त्यांच्याकडून पुन्हा इराणवर हल्ला केला जाऊ शकतो.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत असलेले नाव आहे. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील, याचा अजिबातच नेम नाही. यादरम्यानच इराणवर मोठे युद्धाचे संकट आहे. डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेत युद्धाच्या तयारीत आहेत. (Donald Trump) त्याबाबत ते विचारही करत आहेत. एक्सियोसने म्हटले की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार, मिडटर्ममधील निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे मोठे नुकसान झाले तर डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात अधिक आक्रमक हल्ल्याचे आदेश देऊ शकतात. पण व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने बोलताना हा दावा खोटा असल्याचेही म्हटले. इराणवरील हल्ल्याचा आणि या निवडणुकीचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने जर पुन्हा इराणवर हल्ला करण्यास सुरूवात केली तर याचा परिणाम फक्त इराणलाच नाही तर जगाला भोगावा लागेल. होर्मुज खाडी अजूनही अशांत आहे. होर्मुज खाडीत संघर्ष हा अधिक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत इराणवरील हल्ल्याचे संकेत दिले. हे युद्ध निर्णायक असेल असेही सांगितले जातंय.
फ्लोरिडामधील रॅलीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील म्हटले की, आम्ही एक छोटे एपिक फ्यूरी ऑपरेशन करू शकतो. इराणला स्वत:ला मान्य करावे लागेल किंवा ते जर हुशार असतील तर तेच म्हणतील की, चला कामाचे बोलूयात. पण मला वाटत नाही की, ते असे काही करतील कारण ते हुशार नाहीत. ऑपरेशन एपिक फ्यूरी अमेरिका आणि इस्त्रायल दोघे मिळून फेब्रुवारीमध्ये इराणच्या मिसाईल आणि परमाणु ठिकाणांना टार्गेट करून हल्ले केले जातील. हे इराणविरोधात मोठे युद्ध असेल. (Donald Trump) ज्यात त्यांच्या मिसाईल ठिकाणांनाच टार्गेट केले जाईल. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीनंतर पुन्हा आपला मोर्चा इराणकडे वळवतील. मात्र, या युद्धाचा फटका कोणत्या दोन देशांना बसत नाही तर अनेक देशांना बसतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर इराणवर हल्ले करण्याचे आदेश दिले तर त्याचा परिणाम जगाला भोगावा लागेल.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात