संजय राऊत यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पूर्णेकर हत्याप्रकरणातील आंदोलकांना पोलिसांनी अमानुष मारहाण करत त्यांच्यावर ॲसिड व मिरची पावडर टाकल्याचा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संवेदनहीनतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकाराला शिंदे सरकारची गुंडगिरी संबोधले. दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी करत राऊतांनी ठाण्यात खळबळ उडवून दिली आहे.

ठाण्यात पूर्णेकर हत्याप्रकरणातील आरोपी पकडले जावेत म्हणून आंदोलन सुरू आहे. तरुण मुलं आंदोलन करत आहेत. या तरुण मुलांना अटक करून पोलिसांनी निर्दयपणे मारलं. (Sanjay Raut) त्यांच्या पार्श्वभागात अॅसिड टाकलं. लाल मिरचीची पावडर टाकली आहे. कुठे आहेत मुख्यमंत्री? कुठे आहे संवेदनशीलता? ठाण्याचे पोलीस ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या घरी धुणीभांडी करतात का?, असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना हा संताप आणि खळबळजनक आरोप राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यात गुन्हेगारांचं राज्य आहे का? ज्या मुलांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली, ती मुलं काय बोलत आहेत ते बघा. त्यांना पोलीस उचलून नेतात, निर्दयपणे मारतात. हा काय प्रकार आहे? गुंडगिरी आहे का? ज्या पोलिसांनी तरुणांना मारहाण केली, त्या पोलिसांची नावे आम्ही जाहीर करणार आहोत.(Sanjay Raut) याबाबत मी राम पूर्णेकरांशी थोड्यावेळाने बोलणार आहे. पोलीस खात्यातील नराधम आहेत. एकनाथ शिंदेंच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या या पोलिसांच्या घरावर आम्ही मोर्चा काढू. अन्याय करणारे हे पोलीस कोण आहेत, ते लोकांना कळलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
पूर्णेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आम्ही युनायटेड नेशन्सला कळवणार आहोत. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्री या प्रकरणात सपशेल नापास आहेत. त्यांनी पद सोडलं पाहिजे. काय सुरू आहे? कुणी कुणाला गोळ्या घालत आहे. पोलिसांनी शिंदेंचे गुंड म्हणून काम सुरू केलं आहे. पण सर्वांनी लक्षात ठेवावं कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. तुम्ही खाकी वर्दी घालून तुम्ही गुंडगिरी करत असाल तर तुम्हाला मारलं जाईल. तुमचा एन्काऊंटर करू, असा इशारा त्यांनी दिला. एका बाईसाठी आणि तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी इतकी अमानुषता? ती काय झाशीची राणी आहे का? की ताराबाई आहे? मला कळत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. शेतकऱ्यांचे मृतदेह जनावरांना खायला द्या. त्यांच्या मयताला कुणीही जाऊ नका, असं म्हणणाऱ्या आमदाराच्या निलंबनाचा ठराव आणला पाहिजे. (Sanjay Raut) अशा प्रकारची असंवेदनशील व्यक्ती विधानसभेत असतील तर विधानसभेची नाचक्की आहे. या आमदाराचा करावा तेवढा धिक्कार कमी आहे. त्यांचे नेते काय करत आहेत? असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात