महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. केरळमध्ये नियोजित वेळेत दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेगाने पुढे कूच केली असून तो गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास कायम आहे. (monsoon) अशा परिस्थितीत हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मान्सून जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनने गती घेतली असून 5 जूनपर्यंत त्याने कर्नाटक राज्याचा मोठा भूभाग तसेच तामिळनाडू मधील काही क्षेत्र व्यापले आहे. यानंतर तो गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचल्याने महाराष्ट्रातील प्रवेशाची शक्यता अधिक बळकट झाली आहे. अरबी समुद्रातून वाहणारे मजबूत पश्चिमेकडील वारे मान्सूनला पूरक ठरत असल्याने दक्षिण कोकणात त्याचे आगमन आता लवकरच होण्याची चिन्हे दिसत आहेत. (monsoon) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढलेला दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी कोसळत आहेत, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. पावसामुळे तापमानात किंचित घट झाली असली तरी हवेत वाढलेल्या ओलाव्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाऊस आणि उष्णता अशा दोन्ही परिस्थिती एकाचवेळी अनुभवायला मिळत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनसाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती अनुकूल बनली आहे. त्यामुळे 7 जूनपर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढील भागांकडे सरकेल. मुंबई शहरात यंदा 9 ते 10 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (monsoon) त्यामुळे शेतकरी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खरीप हंगामाच्या तयारीसाठी पुढील काही दिवस विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत.हवामान तज्ज्ञांच्या मते, कोकण भागात मान्सूनचा वेग अधिक राहू शकतो. मात्र विदर्भ , मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील अंतर्गत भागांमध्ये त्याचा विस्तार तुलनेने मंदगतीने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धुळे , नंदुरबार, जळगाव , नाशिक , छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर, पुणे , सांगली , सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद
भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?