कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
राजकारणात आपणाला कोणी फारशी किंमत देत नाही. आपणाला गृहीत सुद्धा धरले जात नाही. मीडिया विचारत नाही. थोडक्यात सांगायचे तर आपण सार्वजनिक जीवनात अडगळीत पडलो आहोत अशा मानसिकतेतून नैराश्यात गेलेली काही राजकीय मंडळी वादग्रस्त विषयावर आपली जीभ मोकळी सोडतात. आणि आपल्या नसलेल्या उपद्रव मूल्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. लातूरचे आमदार अमित देशमुख हे त्यापैकीच एक होत. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव म्हणून त्यांची ओळख आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी टिपू सुलतान जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी टिपू चे उदात्तीकरण केले . तो एक महान स्वातंत्र्य सेनानी होता, उत्तम प्रशासक होता. असे त्याचे वर्णन केल्यानंतर ते अचानक मीडियाच्या फ्रेम मध्ये आले.

औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या विषयी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याच्या प्रकारातून सामाजिक वातावरण गढूळ होण्याच्या घटना अधून मधून घडत असतात. हे मुस्लिम शासक खलप्रवृत्तीचे म्हणून ओळखले जातात. (politics) पण काही जणांना ते इतिहास पुरुष वाटतात. मग त्यांचे उदात्तीकरण केले जाते. मग त्यातून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अतिशय संयत भाषेत व्यक्त होणारे नेते होते. त्यांनी कधीही वादग्रस्त वक्तव्य केले नाही. एक शालीन आणि सामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा नेता ही त्यांची ओळख होती. अमित देशमुख हे त्यांचेच चिरंजीव. त्यांनीच टिपू सुलतानचे गोडवे गाताना त्याचा पराक्रमी इतिहास स्वतंत्र पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आणण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे भाषण म्हणजे स्तुती पाठकाचा उत्तम नमुना म्हटला पाहिजे.
टिपू सुलतान हा महापराक्रमी, इंग्रजांशी युद्ध करणारा, सेक्युलर राजा होता. असा जावई शोध लावताना त्यांनी त्याचे पुरावे मात्र दिलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी त्यांनी भाषण दिले आहे, असे कधी ऐकिवात आलेले नाही. टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केलेले आहेत. (politics) त्यामुळेच टिपू सुलतान याची जयंती साजरे करणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे धाडस सध्या अनेकांच्याकडून केले जात आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी त्याची जयंती साजरी करण्यात आली आहे.
गजानन भास्कर मेहेंदळे हे महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात. नुकतेच त्यांचे निधन झाले आहे आणि त्यांची इतिहास संशोधने कागदपत्रांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यांनी टिपू सुलतान विषयी संशोधन पर लिखाण केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रे, तत्सम पुरावे याचा आधार घेऊन त्यांनी टिपू सुलतान विषयी सत्य मांडले आहे. टिपू सुलतान ने इंग्रजांशी लढा दिला तो केवळ स्वतःचे राज्य टिकवण्यासाठी. त्यामध्ये राष्ट्रवादी किंवा भारतीय स्वातंत्र्याची भावना अजिबात नव्हती. त्याची धार्मिक असहिष्णूता, हिंदूं, ख्रिश्चन यांच्यावर केलेले अत्याचार, त्याची जिहादी वृत्ती आणि परकीयांकडून घेतलेली मदत याविषयी मेहेंदळे यांनी सविस्तर विवेचन केले आहे. तुर्कस्तानच्या खलिफाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी मी इथल्या चार लाख काफिरांना ठार मारले आहे अशी माहिती दिली आहे शिवाय भारतावर आक्रमण करण्यासाठी येण्याचे आमंत्रणच त्यांने दिले होते.
क्रूर सत्ताधीश आणि कट्टर धर्मांध असे त्यांनी टिपू सुलतान चे वर्णन केले आहे. टिपू सुलतान चे जेव्हा जेव्हा उदात्तीकरण केले गेले तेव्हा तेव्हा अनेकांनी इतिहास संशोधक मेहेंदळे यांचे संशोधन पुढे केले आहे. वास्तविक राज्य शासनाने पुढाकार घेऊन इतिहास परिषदेच्या माध्यमातून इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांची समिती गठित करावी आणि त्यांना टिपू सुलतान विषयी एक अहवाल तयार करून तो अधिकृत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावा. या अहवालाच्या बाहेर जाऊन जो कोणी टिपू सुलतान विषयी बोलेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी. असे झाले तरच उदात्तीकरण थांबणार आहे.सामाजिक वातावरण गढूळ करण्यासाठी, (politics) कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्यासाठी, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी काही असामाजिक घटक कधी औरंगजेब तर कधी टिपू सुलतान यांचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवतात.
या प्रकाराला सुद्धा आळा बसण्यासाठी कठोर उपाय योजना करण्यात आल्या पाहिजेत.
हेही वाचा :
ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात