रॅपिडो विरोधात महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी चालकांनी बंद पुकारला आहे. (Maharashtra) त्यानंतरही अनेक रिक्षा रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे संपावरून संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात आज रिक्षा संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामुळे मुंबईसह राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये रिक्षा सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही रिक्षा रस्त्यावर देखील दिसत आहेत. त्यामुळे संपावरून रिक्षा चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.

रिक्षा संपाचे पडसाद मुंबई, पुण्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरातही रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा नारा दिला आहे. पुणे शहरातील बाईक टॅक्सी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज रिक्षा संघटनांचं आंदोलन करणयात आलं. आज सकाळी 11 वाजता परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रिक्षा बंद राहणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. पुणे शहरातील बाईक टॅक्सीला हद्दपार करण्याच्या मागणीसाठी रिक्षा पंचायत आणि मित्र संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकार बाईक टॅक्सीला पुन्हा नव्याने परवानगी देण्याच्या तयारीत असल्याने रिक्षा पंचायत संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. आंदोलनात पूर्णपणे परवानगी देणारे धोरण रद्द करावे ही प्रमुख मागणी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहे.
रॅपिडोच्या विरोधात ऑटो-टॅक्सी युनियनने आज संप पुकारलाय. मात्र, मुंबई उपनगरातील गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि मालाडमध्ये या संपाचा परिणाम दिसत नाहीये. (Maharashtra) सर्व ठिकाणी ऑटो रिक्षा, टॅक्सी सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. बोरिवलीमध्येही ऑटो रिक्षा सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. मुंबईत मनसे वाहतूक सेना आणि धडक कामगार युनियनसह अनेक संघटनांनी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, पण त्याचाही परिणाम दिसत नाहीये.
रिक्षा, टॅक्सी चालकांकडून रॅपिडो आणि उबरच्या बाईक टॅक्सी सेवांना रिक्षा संघटनांचा तीव्र विरोध केला जात आहे. (Maharashtra) आवश्यक परवानग्यांशिवाय बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा संघटनांचा आरोप आहे. बाईक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांवर आर्थिक भार वाढला आहे. रिक्षांच्या मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा :
ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात