पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान घडलेली दुर्घटना सुरुवातीला अपघात मानली जात होती. मात्र तपास पुढे सरकल्यानंतर हा मृत्यू नियोजित कटाचा भाग असल्याचा संशय बळावला. (Lohagad) या प्रकरणात केतन यांच्या होणाऱ्या पत्नीला अटक करण्यात आल्यानंतर तिची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

अपघात समजल्या गेलेल्या घटनेचा उलगडा गेल्या आठवड्यात केतन अग्रवाल यांचा लोहगड परिसरातील सुमारे 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. बचाव पथकाने प्रयत्न करून त्यांना वर आणले, मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. विशेष म्हणजे काही महिन्यांनंतर त्यांचा विवाह होणार होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जून रोजी त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस होता. (Lohagad) त्यामुळे या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.तपासादरम्यान पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटू लागल्या. चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे समोर आलेल्या माहितीनुसार, सियाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तिने आपल्या मित्राच्या मदतीने केतन यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह फिरायला गेलेल्या या समूहामध्ये योग्य संधी साधून केतन यांना दरीत ढकलण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चौकशीत कबुली, पोस्ट झाली व्हायरल घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र पुढील तपासात घटनाक्रमातील विसंगती, तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजमधील संशयास्पद हालचाली यामुळे तपासाची दिशा बदलली. विशेषतः हुडी घालून फिरणाऱ्या एका तरुणाच्या हालचाली पोलिसांच्या रडारवर आल्या. (Lohagad) त्यानंतर सियाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तिच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी अधिक कसून तपास केला. त्यानंतर तिने मित्राच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या अटकेनंतर सियाची सोशल मीडियावरील जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आहे. केतन यांच्या मृत्यूनंतर आणि स्वतःच्या वाढदिवशी तिने इन्स्टाग्रामवर त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत भावनिक संदेश लिहिला होता. त्यामध्ये तिने “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास, आपण लग्नाच्या इतके जवळ असताना हे का घडलं?” अशा आशयाचे दुःख व्यक्त केले होते. त्यावेळी हा मृत्यू अपघाती असल्याचे मानले जात असल्याने अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र आता तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर हीच पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?