लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याची १० तारीख उजाडली असू अद्याप लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही.याच संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा ₹१५०० रुपये जमा केले जातात. मागील हप्ता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर पाठवला गेला. (Ladki Bahin) त्यामुळे पुढील हप्ता नेमका कधी मिळणार आणि किती रक्कम खात्यात जमा होणार, याकडे राज्यातल्या लाखो महिलांचे लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आता गौरी- गणपतीचा सण जवळ आल्याने ऑगस्ट महिन्याचा रखडलेला हप्ता लवकर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin) प्रशासकीय पातळीवर १० सप्टेंबरपर्यंत आवश्यक निधी संबंधित विभागाकडे वर्ग करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.निधी उपलब्ध झाल्यानंतर १६ सप्टेंबरपासून DBT द्वारे १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात होऊ शकते. हा निधी टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र, काही तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे २० सप्टेंबरपर्यंत ऑगस्टचा हप्ता जमा झाला नाही. तर सरकारकडून वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा १० ऑक्टोबरपर्यंत ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी तब्बल ३००० रुपये जमा होऊ शकतात. सध्या मात्र ₹१५०० की ₹३०००, याबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. (Ladki Bahin) त्यामुळे लाभार्थी महिलांचे लक्ष सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?