कानपूर हादरलं, 10 वर्षाच्या भावाला बांधून ठेवत 7 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार

वडिल कामावर जाताच आरोपीने डाव साधला. बहिण-भावाला खेळण्याच्या बहाण्याने अज्ञान स्थळी नेऊन भावासमोर आरोपीने केला अत्याचार. घटना ऐकून कानपूर हादरलं.

कानपूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब मूळचे फतेहपूर येथील असून सध्या ते सचेंडी परिसरात भाड्याच्या घरात राहतात. कुटुंबप्रमुख एका कारखान्यात काम करतात. (Kanpur)काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते एकटेच आपल्या दोन मुले आणि दोन मुलींचा सांभाळ करत आहेत.

डबल सीएनजी सिलिंडर सोबत येत आहे ही 7 सिटर कार, सोबत टर्बो इंजिनाची ताकद घटनेच्या दिवशी वडील कामावर गेले असताना त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होते.(Kanpur) त्याच वेळी परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणारा दीपक नावाचा युवक तेथे आला. घराजवळील चहाच्या टपरीमुळे मुलांना तो आधीपासून ओळखीचा होता. त्याने मुलांना फिरायला नेण्याचे आमिष दाखवले आणि ते त्याच्यासोबत गेले.

भावाचे पाय बांधून बहिणीवर अत्याचार यानंतर आरोपीने दोन्ही मुलांना किसाननगर पुलाजवळील एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने खेळण्याच्या बहाण्याने 10 वर्षांच्या मुलाचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्याला पुलाजवळ टाकून दिले. त्यानंतर त्याने त्या निरागस मुलीवर अत्याचार केला. मुलगी मदतीसाठी ओरडत होती, मात्र आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केले. हा संपूर्ण प्रकार तिच्या भावाच्या डोळ्यांसमोर घडत होता.

घटनेनंतर आरोपी दोघांनाही त्या अवस्थेत सोडून पळून गेला. जाताना त्याने धमकी दिली की, जर कुणाला काही सांगितले तर त्यांना ठार मारेल. काही वेळाने मुलाने स्वतःची सुटका करून घेतली आणि दोघेही रडत-रडत घरी पोहोचले. वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांनी ही घटना सांगितली. मुलांच्या अंगावर जखमांचे निशाण पाहून वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीनानाथ मिश्रा यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अत्याचार,अंतर्गत गुन्हा आणि जीवे मारण्याची धमकी अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. (Kanpur) दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला आवश्यक उपचार दिले जात आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?