बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन वयाच्या 83 व्या वर्षीही कामात असून सोशल मीडियावरही नियमितपणे आपल्या भावना व्यक्त करत असतात. (Amitabh Bachchan) त्यांच्या अलीकडील पोस्टने पुन्हा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी फिफा विश्वचषकातील निर्णयांवर नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या पोस्टमध्ये तब्येतीसंदर्भातील त्रासाबद्दल भाष्य केले.

फिफा विश्वचषकावरील पोस्टची चर्चा फिफा विश्वचषक 2026 अंतिम टप्प्यात पोहोचला असून अर्जेंटिना, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 19 जुलै रोजी अंतिम सामना होणार असून स्पर्धेतील काही निर्णयांवर जगभरातील फुटबॉलप्रेमींनी आक्षेप घेतले आहेत. या चर्चेत अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेत सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली.भारतीय वेळेनुसार सामने उशिरा रात्री होत असल्याने दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Amitabh Bachchan) तरीही सामने पाहताना काही संघांसाठी वेगळे आणि इतरांसाठी वेगळे निर्णय घेतले जात असल्याचे दिसल्याने निराशा वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच मोरोक्कोसारख्या संघाच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आणि फिफा विश्वचषकाची तुलना आयपीएलशी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील खेळाडूंच्या भूमिकांबाबतही आपले मत मांडले.
पोस्टमध्ये नेमक काय लिहलं? फुटबॉलवरील पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांनी आणखी एक पोस्ट करत आपल्या प्रकृतीबद्दल भाष्य केले. त्यांनी लिहिले की, एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर संपूर्ण शरीराने जणू बंड पुकारले असून त्यांना मोठा त्रास जाणवत आहे. शरीर सतत हालचालीत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पोस्टमधून सांगितले.अमिताभ बच्चन यांनी पुढे नमूद केले की, शरीराला नियमित हालचालीची सवय असल्याने विश्रांतीनंतर पुन्हा हालचाल सुरू करण्याचा प्रयत्न केला. (Amitabh Bachchan) त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत त्यांना काळजी घेण्याचा आणि लवकर बरे राहण्याच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?