इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर दिसू लागला आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या घटनांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील इंधनदरांबाबतही चिंता व्यक्त केली जात असली, तरी 15 जुलै 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुज खाडी मार्गे जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचा पुरवठा प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (petrol and diesel) यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 3 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 86 डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

भारताच्या शेजारील काही देशांनी इंधनदरांमध्ये वाढ केली असून, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारतीय सरकारी तेल कंपन्यांवरही आर्थिक दबाव वाढल्याचे मानले जात आहे. हा तणाव आणखी काही दिवस कायम राहिल्यास भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (petrol and diesel) यापूर्वीही इराण-अमेरिका संघर्षाच्या काळात केंद्र सरकारने चार वेळा इंधनाच्या किमती वाढवल्या होत्या. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्यांनी 15 जुलै 2026 रोजीचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दर स्थिर ठेवण्यात आले असले, तरी वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण कायम असल्याचे सांगितले जात आहे.
आज मुंबई येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.21 रुपये असून, दिल्ली मध्ये तो 102.12 रुपये आहे. कोलकाता येथे पेट्रोल 113.51 रुपये प्रतिलिटर, तर चेन्नई मध्ये 107.77 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. डिझेलबाबत बोलायचे झाल्यास, दिल्लीमध्ये प्रतिलिटर 95.20 रुपये, कोलकातामध्ये 99.02 रुपये, मुंबईत 97.83 रुपये आणि चेन्नईमध्ये 99.55 रुपये असा दर कायम ठेवण्यात आला आहे. संघर्षाचा परिणाम पुढेही होण्याची शक्यता अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, इराणशी संबंधित संघर्ष तीव्र झाल्यापासून त्यात जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. होर्मुज खाडीत व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. (petrol and diesel) त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता कायम असून, याचा परिणाम आगामी काळात इंधनाच्या किमतींवर होऊ शकतो.
हेही वाचा :
इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही?
सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही?
आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी?