तुकाराम मुंढेंच्या FDA च्या धडाधड कारवाईचा धडाका सुरु आहे. अशातच रेणापूर येथील प्रसिद्ध ‘बेंगलोर अय्यंगार्स बेकरी’वर लातूरच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे रेणापूर परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये व व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भीषण अस्वच्छता आणि गलिच्छ वातावरणात सुरू होते काम रेणापूरमधील मुख्य केंद्र असलेल्या महात्मा गांधी चौक भागात ही बेकरी गेल्या काही काळापासून कार्यरत होती. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने जेव्हा या बेकरीत (famous) अचानक तपासणीसाठी पाऊल ठेवले, तेव्हा तिथली भीषण परिस्थिती पाहून स्वतः अधिकारीही चक्रावून गेले. बेकरीच्या अंतर्गत भागात अत्यंत गलिच्छ, दुर्गंधीयुक्त आणि कमालीच्या अस्वच्छ वातावरणात ग्राहकांसाठीचे विविध अन्नपदार्थ बनवले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या थेट निदर्शनास आले.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; मुदतबाह्य कच्चा माल जप्त या तपासणीदरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे, ग्राहकांच्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता चक्क मुदतबाह्य कच्चा माल वापरून बेकरीचे पदार्थ (केक, बिस्किटे, पफ इत्यादी) तयार केले जात होते. बेकरीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या शासकीय नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आली होती, (famous) ज्यामुळे ही उत्पादने खाणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
परवाना तात्काळ निलंबित; बेकरीला ठोकले टाळे बेकरी चालकाचा हा उघड निष्काळजीपणा, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन पाहता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच कडक पावले उचलली. या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय जागेवरच तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. (famous) तसेच, या बेकरीचा संपूर्ण व्यवसाय तातडीने बंद पाडत प्रशासनाच्या वतीने दुकानाला सील ठोकण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक आणि तडकाफडकी निर्णयामुळे रेणापूरमधील इतर हॉटेल आणि बेकरी व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या जिवाशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्नपदार्थ विक्रेत्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा या कारवाईच्या माध्यमातून लातूर जिल्हा प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही संपूर्ण जिल्ह्यात अशा बेकायदा, अस्वच्छ हॉटेल्स आणि बेकऱ्यांवर तपासणीचे व कारवाईचे सत्र अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हेही वाचा :
शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?
12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?