थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर करावाई करण्यात आलीय. दक्षिण २४ परगणा येथील आमतला येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयावर ही कारवाई केली गेली. हे कार्यालय कोणत्याही परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आलंय. त्यावरूनच ही कारवाई करण्यात येत आहे. अभिषेक बॅनर्जी यांची पाच मजली इमारत आता जमीनदोस्त केली जात आहे. याआधी ३० जूनला अभिषेक बॅनर्जी यांना एक नोटीस पाठवण्यात आली होती. (Bulldozer action) त्यावर खासदारकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.

अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाबाहेर सध्या तीन बुलडोझर आहेत. त्याच्यामार्फत पाडकाम केलं जातंय. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून हे कार्यालय बंद होते. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हे कार्यालय बेकायदेशीरपणे उभारण्यात आले होतं. ते कोणत्याही कागदपत्रांशिवाय बांधले गेले होतं. नोटीस बजावल्यानंतरही कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती.अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बरचे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. (Bulldozer action) त्यांचे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील अमतला येथील कार्यालय पाडण्याची कारवाई केली जातेय. शनिवार दुपारपासूनच या कार्यालयाबाहेर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांची उपस्थिती दिसून येत होती. ही पाडकाम मोहीम सुरू होण्यापूर्वीच तिथे तीन बुलडोझर आणण्यात आले होते.

दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाने ३० जून रोजी अभिषेक बॅनर्जी यांच्या आमतला येथील कार्यालयाला सर्वप्रथम नोटीस पाठवली. या नोटीसद्वारे कार्यालयाच्या बांधकामाशी संबंधित विविध कागदपत्रे आणि परवानग्यांबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. त्यानंतर ७ जुलै रोजी आणखी एक नोटीस बजावण्यात आली. (Bulldozer action) त्यासोबतच या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी १५ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले.

हेही वाचा :

शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?

12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?