आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ?

आषाढी-एकादशीनिमित्त तुम्हीही उपवासाचे पदार्थ शोधत आहात का? मग बटाट्याची उसळ तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. ही उसळ फक्त १० मिनिटांत तयार होते.

उपवासासाठी मोजून काही पदार्थ खाल्ले जातात.यात बटाट्याची उसळ, चांगलीच लोकप्रिय.ही उसळ तुम्ही कमीत कमी वेळेत तयार करु शकतात. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिमय सण मानला जातो. या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीने संपूर्ण वातावरण भारावून जाते. (foods) अनेक भाविक उपवास करतात, तर काही जण साधे, सात्त्विक आणि चविष्ट जेवण तयार करून कुटुंबासोबत या दिवसाचा आनंद घेतात. अशा वेळी बटाट्याची उसळ हा एक पारंपरिक आणि सर्वांना आवडणारा पदार्थ ठरतो.

महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली बटाट्याची उसळ ही कमी मसाल्यातही अतिशय स्वादिष्ट लागते. उकडलेल्या बटाट्यांना फोडणीचा सुगंध, हळदीचा सुंदर रंग, हिरव्या मिरचीची हलकी तिखट चव आणि शेवटी कोथिंबिरीचा ताजेपणा मिळाल्यामुळे ही उसळ अधिकच रुचकर बनते. ही उसळ पुरी, पोळी, भाकरी किंवा गरम फुलक्यांसोबत अप्रतिम लागते. (foods) आषाढी एकादशीच्या निमित्ताने घरच्या घरी सहज तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य
उकडलेले बटाटे – ३ ते ४
साजूक तूप – १ चमचा (किंवा शेंगदाणा तेल)
जिरे – १/२ चमचा
हिरव्या मिरचीची पेस्ट
शेंगदाण्याचा कूट – २ ते ३ चमचे (जाडसर भाजलेला)
चवीनुसार – मीठ
लिंबाचा रस – १ चमचा
Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

कृती
यासाठी सर्वप्रथम बटाटे कुकरमध्ये ४ शिट्ट्या देऊन उकडून घ्या.
उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे (फोडी) करा.
कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून परता.
यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून २ मिनिटे परतून घ्या.
आता शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
कढईवर झाकण ठेवून २-३ मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या.
शेवटी लिंबाचा रस पिळा आणि (foods) कोथिंबीर घालून उसळ खाण्यासाठी सर्व्ह करा.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?