मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (discussion) तिच्या धाडसी कृतीमुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान तरुणीच्या धाडसी कृतीने सर्वांचे लक्ष वेधले.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या ओळखीबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.या घटनेनंतर अनेकांनी तिच्या धैर्याचे कौतुक करत विविध प्रतिक्रिया दिल्या. दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील काही काळापासून काॅकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. सोशल मिडियावर याचे अनेक व्हिडिओज देखील शेअर करण्यात आले आहेत. अशातच आता मुंबईमध्येही विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरुन आंदोलने करायला सुरुवात केली आहे. इंटरनेटवर या आंदोलनांची चर्चा होत असतानाच आता एका मुलीचा व्हिडिओ अलिकडे प्रचंड ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी पोलिस व्हॅनला अडवताना दिसली. खरंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये बंद केले होते. (discussion) अशात मुलीने धाडसाने रस्त्यातच व्हॅन अडवली आणि मुलांना व्हॅनमधून मुक्त केलं. मुलीच्या धैर्याचे आता सोशल मिडियावर काैतुक होत असून याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबईमध्ये पोलिस व्हॅन अडवणाऱ्या मुलीचे नाव आहे रिया यादव. रिया एका अभिनेत्री, माॅडल आणि उद्योजक आहे. रिया सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे आपले मत मांडते. एक उद्योजिका म्हणून, ती हाताने कपडे शिवते. तिचा ‘रियासत’ नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. रियाला नृत्याचीही आवड आहे. तिने अनेक म्यूजिक व्हिडिओमध्येही काम केले आहे ज्यात अलीकडील ‘दिलबरा’ या गाण्याचा समावेश आहे. स्वभावाने रिया धार्मिक असून तिचा देवावर फार श्रद्धा आहे. ती दररोज मंदिरांमध्ये जाऊन देवाची पूजा-अर्चा करते. रिया मागील काही काळापासून इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या विरोध प्रदर्शनादरम्यान रियाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच लक्षवेधी ठरला. यात ती पोलिसांसमोर निडर होऊन त्यांची व्हॅन अडवताना दिसून आली. रियाने एकटीनेच पोलिसांना व्हॅन पुढे नेण्यापासून रोखून ठेवले.
बुधवारी शिवाजी पार्कमध्ये होत असलेल्या आंदोलनात रिया प्रमुख चेहरा ठरली. रिया दादरमधील कोहिनूर चौकातून शिवाजी पार्ककडे चालत जात असताना तिला ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी भरलेली एक पोलीस व्हॅन दिसली. ती लगेच व्हॅनच्या दिशेने वळली आणि व्हॅनचा रस्ता अडवत समोर जाऊन उभी राहिली. इतकंच नाही तर व्हॅनच्या जवळ जाऊन तिने एका हाताने व्हॅनला पुढे जाण्यापासून रोखून धरले. वृत्तानुसार, पोलिसांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांना नंतर सोडून देऊ असेही त्यांनी म्हटले पण शेवटपर्यंत रिया हटण्यास तयार झाली नाही. अखेरीस, रियाच्या प्रयत्नांना यश आले आणि पोलिसांनी सर्व आंदोलकांना व्हॅनमधून सोडून दिले.
रियाने आरोप लावला की, पोलिस आपले काम जबाबदारीने करत नाहीयेत. जर ते आपली जबाबदारी नीट पार पाडत नसतील तर आपणच स्वतःच आपल्या नागरिकांची जबाबदारी घेतली पाहिजे. रियाने मिडियाला सांगितले की, ती दलित नाही, ओबीसी नाही, तिचे वडिल शेतकरी आहेत. तिने विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला कारण पोलिस त्यांना विनाकारण मारहाण करत होते. (discussion) यासोबतच आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा तिला अभिमान असल्याचेही तिने मिडियाला सांगितले.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?