वाईट बातमी, जगातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल?

जगातली सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हल्ला झाला आहे. अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली. अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. यात नेमकं किती नुकसान झालय ते समोर आलेलं नाही.

अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील वातावरण आधीच तापलेलं आहे. (oil company)या दरम्यान जगातली सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हल्ला झाला आहे. सौदी अरेबिया आज सकाळी मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याने हादरला. अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली. सौदी अरेबियाच्या जिजान औद्योगिक शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. जिजानमधील सौदीच्या एका महत्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्यामध्ये टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीला धोका निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येमेनमधून हा हल्ला करण्यात आला. त्यांनी अरामकोशी संबंधित तेल सुविधा केंद्राला टार्गेट केलं. येमेनमधून सौदी अरेबियाच्या जिजान, यानबू आणि दमाद भागावर हल्ले झाले. सौदी सिविल डिफेन्स फोर्सने यानबू प्रांतासाठी आपातकालीन अलर्ट जारी केला आहे.

अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. यात नेमकं किती नुकसान झालय ते समोर आलेलं नाही. (oil company)त्यामुळे जगातील अनेक देशांची चिंता नक्कीच वाढली असणार. कारण याचा थेट परिणाम तेल पुरठव्यावर आणि किंमती वाढण्यावर होऊ शकतो. अमेरिका-इराण मध्ये युद्ध सुरु असतानाच सौदी अरेबिया आणि येमेनमधील हूती बंडखोरांमधील तणावाने सुद्धा टोक गाठलं आहे. शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाने येमेनमधील हुतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेइदा शहरावर हल्ला केलेला. हूतीच्या परराष्ट्र मंत्रालयाने इशारा दिलेला की, हा हल्ला सौदी अरेबियाला महाग पडेल. आम्ही याचं उत्तर देऊ. त्यांनी तसचं केलं. हूतीशी संबंधित अल मसीरा टीव्हीनुसार सौदीने होदेइदामधील दूरसंचार प्राधिकरण सुविधेला टार्गेट केलं. कमरान बेटावर सुद्धा हल्ले केलेल. यात एक महिला जखमी झाली.

लाल समुद्रात सौदीच्या तेल टँकर्सना ड्रोन आणि मिसाइलने टार्गेट केल्याचा दावा बुधवारी हुतीने केला होता. (oil company)यात एका जहाजाचं नुकसान झालेलं. 20 जुलैला जाहीर केलेल्या नाकेबंदीतंर्गत हूतीने ही कारवाई केलेली. सना विमातनळावरील हल्ल्याला हे प्रत्युत्तर होतं. सौदी समर्थित सरकारने विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली. दोन्ही बाजूंमध्ये 2022 पासून असलेला शांतता करार आता मोडताना दिसतोय. लाल सागर मार्गावरील जागतिक व्यापाराची चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?