संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची साथ सोडली आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी झाला. ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला संघात घेतला. (Sanju Samson) पण या ट्रेडदरम्यान जोखिम असल्याचं मत आता संजू सॅमसनने व्यक्त केलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपासून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. यापूर्वी संजू सॅमसनने 11 वर्षे राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यामुळे फ्रेंचायझी सोडताना नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा संजू सॅमसनने केला आहे. क्रिकेट कारकिर्दीतील हा निर्णय म्हणजे जोखिम असल्याचं स्पष्टीकरण संजू सॅमसन याने दिलं आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत सुमार कामगिरीनंतर महेंद्रसिंह धोनीचा एक सल्ला कामी आला. (Sanju Samson) त्याच्या त्या शब्दांमुळे आत्मविश्वास परतला आणि स्पर्धेत चांगली कामगिरी केली. संजू सॅमसनने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 14 डावात 4336 च्या सरासरीने आणि 165.63 च्या स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या. या दरम्याने त्याने दोन शतकं ठोकली आणि एक अर्धशतकही साजलं केलं. त्याचा या कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्ससाठी डील फायद्याची ठरली असंच म्हणावं लागेल. आता यावर संजू सॅमसनने आपलं म्हणणं मांडलं.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या संजू सॅमसनने जिओस्टारवर सांगितलं की, ‘राजस्थान रॉयल्स सोडणे ही एक जोखिम होती. एकदा तुम्ही फ्रँचायझीला तुमच्या भावना सांगितल्या की, मागे फिरता येत नाही. तुम्ही अशा संघात जाऊ शकता जिथे तुम्हाला जायचे नाही किंवा लिलावातही कोणतीही खात्री नसते.’ संजू सॅमसनने पुढे सांगितलं की,’या निर्णयामागे दोन कारणे होती. पहिले म्हणजे, मला खात्री होती की 2025 हा राजस्थान रॉयल्ससोबतचा माझा शेवटचा हंगाम असेल. मी माझ्या कुटुंबाशी आणि पत्नीशी यावर सविस्तर चर्चा केली होती.’
संजू सॅमसन पुढे म्हणाला की, ‘मी एक आत्मविश्वासू व्यक्ती आहे. माझा विश्वास आहे की मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. मी नेहमी शून्यातून सुरुवात करायला तयार असतो. बऱ्याच लोकांनी मला सांगितले होते की माझी फलंदाजीची शैली चेपॉकच्या संथ खेळपट्टीला अनुकूल नसेल.’ पहिल्या तीन सामन्यांमध्ये संजूला संघर्ष करावा लागला. पण संघाच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास मिळाला. (Sanju Samson) दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मोठ्या करारापैकी एक करार होता. संजू सॅमसन 18 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला, तर त्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला रवींद्र जडेजा आणि सॅम करन मिळाले.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?