महाराष्ट्रात 26 ते 31 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यांना अलर्ट जारी?

महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून 26 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकण , मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत जोरदार ते अतिजोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. 26 जुलैला पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

26 जुलैच्या अंदाजानुसार कोकण-गोवा विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस होऊ शकतो. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक (rains) ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरींसह अतिवृष्टी होऊ शकते. मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात काही भागांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

26 जुलैसाठी पुणे घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसरासह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (rains) त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे.

27 जुलैला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार सरी आणि तुरळक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस होऊ शकतो.मराठवाड्यात काही भागांत पाऊस व मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसासह काही भागांत मेघगर्जनेची शक्यता आहे. 28 जुलैलाही कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस आणि (rains) काही ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. या दिवशीही काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?