होर्मुज खाडीत या कारणामुळे भारतीय जहाजावर गोळीबार? सरकारकडून अत्यंत मोठा खुलासा, थेट..

18 एप्रिल 2026 रोजी होर्मुज खाडी परिसरात घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली. या दिवशी एका भारतीय जहाजावर गोळीबार झाल्याची (serious accident) माहिती समोर आली आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध दावे व्हायरल झाले, त्यात भारत सरकारने जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इराणला क्रिप्टोकरन्सी दिल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, भारत सरकारने हा दावा ठामपणे फेटाळून लावत तो पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले.

गोळीबाराच्या घटनेनंतर दोन भारतीय जहाजांनी परतीचा मार्ग स्वीकारत बंदर गाठले, तर पुढे गेलेल्या एका जहाजावर इराणकडून गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे त्या जहाजावर भारतीय ध्वज असतानाही हा प्रकार घडल्याने परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली. या घटनेदरम्यान जहाजाच्या कॅप्टनची एक ऑडिओ क्लिपही समोर आली असून, त्यामध्ये ते सतत गोळीबार थांबवण्याची आणि जहाजाला सुरक्षित मागे वळण्याची विनंती करत असल्याचे ऐकू येते.

सुरुवातीला संबंधित जहाजाला खाडी पार करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र काही वेळातच अचानक गोळीबार सुरू झाल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर चेन्नईस्थित सनमार या जहाज कंपनीने स्पष्टीकरण देत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित सर्व दावे फेटाळले आहेत. कंपनीने सांगितले की, जहाज सुरक्षित ठेवण्यासाठी ते भारत सरकारच्या सर्व संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधत आहेत.

दरम्यान, या भागात अजूनही अनेक भारतीय जहाजे अडकून असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार गंभीरपणे लक्ष ठेवून असून, इराणी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे होर्मुज खाडीतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. अमेरिकेने एका इराणी जहाजाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, इराणभोवती मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या देशातील बंदरांमधून जहाजांची ये-जा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. जगभरातून या संवेदनशील भागात शांतता प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी सध्याची परिस्थिती मात्र चिंताजनकच असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान