कुटुंबीय तळमजल्यावर आजोबांच्या अंत्यविधीची तयारी करताना कोल्हापुरात ३० लाखांचे सोने चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत दिसला पण…

घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनामुळे सुरू असलेल्या अंत्यविधीच्या गडबडीत चोरट्यांनी संधी साधत १८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना लक्ष्मीपुरी मंडई परिसरात घडली आहे. (procession) आज सकाळी सुमारे नऊच्या दरम्यान ही चोरी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरीतील हमीदा अब्दुलमजीद खाटिक यांचे मंगळवारी रात्री निधन झाले होते. त्यानंतर बुधवारी सकाळपासून तळमजल्यावर अंत्यविधीची तयारी सुरू होती. घरातील सर्वजण या कामात व्यस्त असतानाच चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरील खोली गाठली. त्याने लाकडी कपाट फोडून त्यातील सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे अलंकार चोरून नेले.

सुमारे तासाभराने खाटिक यांची मुलगी वरच्या मजल्यावर गेली असता खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट उघडे असल्याचे पाहून तिने तातडीने कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एक संशयित तरुण इमारतीच्या मागील बाजूने बाहेर पडताना दिसून आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान