मतदान करताना सुनेत्रा पवार भावुक, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून मतदान करण्याचं आवाहन; 

Ajit Pawar यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये होत असलेली पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पार पडताना दिसत आहे. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी Sunetra Pawar रिंगणात असून त्यांच्याविरोधात एकूण २१ उमेदवार उभे आहेत.

आज सकाळपासूनच बारामतीत मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सुनेत्रा पवार यांनी (emotional) आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी Parth Pawar, जय पवार, Supriya Sule, रेवती सुळे, श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनीही मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. अजित पवार यांच्या मातोश्रींनी वयोमानामुळे घरीच मतदानाचा अधिकार बजावला.

मतदानानंतर सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनांशी जोडलेली आहे. गेली सहा दशके बारामतीकरांनी पवार कुटुंबावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच या निवडणुकीची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या कामांची परतफेड करण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, ही निवडणूक बारामतीकरांनी स्वतःच्या जबाबदारीची म्हणून स्वीकारली आहे. प्रत्येक मतदार हा आपले कर्तव्य पार पाडत असल्याच्या भावनेतून मतदान करत आहे. अजित पवार यांच्या आठवणींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावागावांतून मतदार बाहेर पडताना दिसत आहेत.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पुढचा प्रवास कठीण असला तरी त्यांच्या विचारांनी आणि आशीर्वादानेच पुढे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बारामतीकरांनी आतापर्यंत अनेक विक्रम केले असून यावेळीही मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान