कुलगाममध्ये भीषण चकमक: 2 जवान शहीद, 11 जखमी

कुलगाम जिल्ह्यातील अखलमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन दरम्यान शनिवारी सकाळी दोन लष्करी जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये भीषण चकमकीत दोन लष्करी जवानांनी सर्वोच्च बलिदान (Sacrifice)दिले आहे. कुलगाम जिल्ह्यातील अखल येथे सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, शनिवारी सकाळी चकमकीत दोन लष्करी जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे. या चकमकीत अकरा सैनिक जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने आपल्या निवेदनात सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे, ज्यात लान्स नाईक प्रीतपाल सिंग आणि जवान हरमिंदर सिंग यांचा समावेश आहे. आज या चकमकीचा नववा दिवस आहे. खरं तर, कुलगाममध्ये लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू असून आज त्याचा नववा दिवस आहे. काही दहशतवादी मारले गेल्याचेही समोर आले आहे. 90 च्या दशकानंतर खोऱ्यात सुरू असलेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

भारत दहशतवादाच्या प्रत्येक नेटवर्कला उखडून टाकण्याच्या उद्देशाने ही कारवाई करत आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत(Sacrifice). गेल्या शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. तर दुसऱ्या दिवशी आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

यादरम्यान, संपूर्ण परिसर गोळीबार आणि स्फोटांनी हादरला होता. सुरक्षा दलांनी सर्व बाजूंनी परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम अजूनही सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे पण परिसरात स्फोटके असण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलांना सावधगिरी बाळगावी लागेल.सध्या, ऑपरेशनच्या नवव्या दिवशी, दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि अकरा जखमी झाले आहेत. संपूर्ण ऑपरेशनमध्ये वीस सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय लष्कराचे पॅरा फोर्स, राष्ट्रीय रायफल्स, जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि सीआरपीएफ संयुक्तपणे ही ऑपरेशन राबवत आहेत. ड्रोन, हेक्साकॉप्टर आणि थर्मल इमेजिंग उपकरणांच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
सलमान-ऐश्वर्या रायची अनोखी गोष्ट: ‘भाऊ’च्या भूमिकेतून प्रेमकथेपर्यंतचा प्रवास
महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी संयुक्त याचिका