IT क्षेत्रात मोठी खळबळ! ‘या’ कंपनीने एका झटक्यात ११,००० कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

जगभरातील आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. Dell Technologies या अमेरिकन टेक कंपनीने तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामागे वाढता Artificial Intelligence वापर आणि खर्च कमी करण्याची रणनीती महत्त्वाची ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, ही कपात अचानक घेतलेला निर्णय नसून दीर्घकालीन नियोजनाचा भाग आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत कंपनीत 97,000 कर्मचारी कार्यरत होते, तर मागील वर्षी ही संख्या 1,08,000 इतकी होती. म्हणजेच एका वर्षात जवळपास 10 टक्के कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.

सध्या आयटी क्षेत्रात Artificial Intelligence आणि ऑटोमेशनचा वेगाने वाढता वापर पाहायला मिळत आहे. अनेक पारंपरिक कामे आता मशीन आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पडत असल्यामुळे कंपन्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI वर अधिक भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर Dell ने ‘cautious hiring’ धोरण स्वीकारले असून, नवीन भरती अत्यंत मर्यादित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नोकरीच्या नव्या संधींवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, कंपनीच्या या निर्णयामागे केवळ AI हा एकमेव घटक नसून खर्च कपात आणि व्यवसाय पुनर्रचनेचाही मोठा भाग आहे. 2025 आर्थिक वर्षातही Dell ने अशाच प्रकारची कर्मचारी कपात केली होती. सेवरन्स खर्चातही घट झाल्याचे दिसून आले आहे. 2026 मध्ये हा खर्च 569 दशलक्ष डॉलर इतका होता, जो मागील वर्षी 693 दशलक्ष डॉलर होता. यावरून कंपनी आता अधिक नियंत्रित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कपात करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Dell चा हा निर्णय केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण टेक उद्योगात बदलाचे संकेत देणारा ठरत आहे. Microsoft आणि Google यांसारख्या दिग्गज कंपन्याही AI आणि खर्च नियंत्रणावर भर देत आहेत. एकूणच, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे उद्योग अधिक कार्यक्षम होत असला तरी रोजगाराच्या संधींवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?