मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार (Rape)केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांताक्रुझ पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे. सांताक्रुझ परिसरात राहणारी पीडित महिला गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक समस्या आणि शारीरिक व्याधींमुळं त्रस्त होती. या त्रासातून मुक्त होण्यासाठी ती अब्दल रशीद नावाच्या एका भोंदू बाबाकडे गेली होती. तेव्हा या भोंदू बाबाने तिच्यावर भूतबाधा झाल्याचे सांगून काही तांत्रिक विधी करावे लागतील तरच भूतबाधा दूर होईल असे तिला सांगितले.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तिला उपचारांसाठी भेटायला बोलावले. तिथे तांत्रिक विधीचे नाटक करुन भोंदू बाबाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही या महिलेला हा उपचाराचा एक भाग असल्याचा गैरसमज झाला. मात्र नंतर तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा तिने तातडीने सांताक्रुझ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपी अब्दुल रशीद विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 64(अ) अन्वये बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्याच्याअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी भोंदू बाबाला अटक केली आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक गुन्हे घडत असतांना सिडकोत एक नवा प्रकार घडलाय. साधूच्या वेशात आलेल्या तिघांनी मांत्रिक बनून महिलेची लूट केलीये(Rape). या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. 10 ऑगस्टला साधूंच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी महिलेला भुरळ घातली. तिच्याकडून तब्बल 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. साधू वेशातील तिघे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने महिलेपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या ‘दीक्षा’ घेण्याच्या आग्रहाला बळी पडून महिला घरातून पैसे देऊ लागली. सुरुवातीला 500 रुपये घेतल्यानंतर, त्यांनी “एक किलो तूप आणा” व “चहा पाजा” अशी मागणी केली. या दरम्यान महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधून तिला भुरळ घालण्यात आली आणि एकूण 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन तिघे फरार झाले.

खऱ्या साधू किंवा तांत्रिक व्यक्ती अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाहीत किंवा अवास्तव दावे करत नाहीत. भूतबाधा, जादूटोणा किंवा तात्काळ उपायांचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा. कोणत्याही तांत्रिक विधीपूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासा आणि विश्वसनीय व्यक्तींकडून सल्ला घ्या.अज्ञात व्यक्तींना पैसे किंवा मौल्यवान वस्तू देऊ नका. तांत्रिक विधी किंवा उपचारांसाठी खासगी ठिकाणी एकट्याने जाणे टाळा.कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा घटनेबद्दल त्वरित स्थानिक पोलिसांना कळवा.
अंधश्रद्धेला बळी पडू नका; वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा.

महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध आणि समूळ उच्चाटन अधिनियम, 2013’ लागू आहे. या कायद्याअंतर्गत भोंदू बाबा किंवा बनावट साधूंना तांत्रिक विधींच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते, जसे की 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड.

हेही वाचा :

व्हायरल Video: लहानग्याच्या हातात साप, पाहून कोब्रा समाजसुद्धा थरथर”