मल्याळम अभिनेत्री रिनी एन जॉर्जने अलिकडेच खळबळजनक दावा केलाय. त्यानुसार केरळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या एका तरुण नेत्याने(Leader) तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवले. इतकेच नव्हे तर त्याने अभिनेत्रीला पंचतारांकित हॉटेलमध्ये येण्याची ऑफरही दिली. तथापि, रिनी एन जॉर्जने त्या नेत्याचे नाव सांगण्यास नकार दिला.हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, मल्याळम चित्रपट स्टार रिनी एन जॉर्ज म्हणाली की तिने त्या नेत्याला अनेक वेळा इशारा दिला आणि त्या पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केल्याचे तिने सांगितले.

तक्रार करुनही त्या नेत्याचे वर्तन बदलले नाही. वारंवार विचारले असता रिनीने त्या नेत्याचे नाव सांगण्यास नकार दिला. तथापि, असे म्हटले जात आहे की ज्या नेत्याबद्दल चर्चा केली जात आहे तो आमदार आहे.रिनी एन जॉर्जने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मला त्या नेत्याकडून आक्षेपार्ह संदेश पाठवले गेले. त्याने मला एका ठिकाणी बोलावले. मी त्याला धमकी दिली तेव्हा त्याने मला पुढे जाण्याचे आव्हान दिले. तो म्हणाला हो जा, जा आणि मला सांग. कोणाला फरक पडतो.’

रिनीने मग सांगितले की ती नेत्याच्या संपर्कात कशी आली. तसेच सांगितले की नेत्याने तिला फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचा मेसेज पाठवला होता. ती म्हणाली, ‘त्या नेत्याने एकदा म्हटले होते की चला पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बुक करूया. तुम्ही या.’
त्यावेळी मी तीव्र स्पष्ट शब्दात नकार दिला होता. नंतर काही काळ काही अडचण आली नाही. पण नंतर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडली. बरेच लोक तक्रारी घेऊन पुढे आले, म्हणून आता मी किमान इतकेच सांगत आहे.’

रिनी म्हणाली, ‘मी सोशल मीडियाद्वारे त्या नेत्याच्या संपर्कात आली. त्याचे हे हलके वर्तन तीन वर्षांपूर्वी सुरू झाले, जेव्हा त्याने मला पहिल्यांदाच आक्षेपार्ह मेसेज पाठवले.’ रिनी अॅनने दावा केला की पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्या नेत्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रिनी अँन जॉर्ज म्हणाली की तिच्या मनात त्या पक्षाच्या लोकांबद्दल असलेली प्रतिमा खराब झाली आहे. तक्रार असूनही तिला मदत करण्यात आली नाही.

तथापि, जेव्हा रिनी अँन जॉर्जला विचारण्यात आले की ती त्या नेत्याविरुद्ध(Leader)कारवाई करेल का, तेव्हा तिने ते नाकारले. अभिनेत्री म्हणाली की तिला तिच्या सुरक्षिततेची काळजी आहे आणि तिचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. तसेच, तिला संबंधित राजकीय पक्षाला लाजवायची नाही.

रिनी अँन जॉर्ज म्हणाली की ती फक्त त्या नेत्याने ज्या महिलांना लक्ष्य केले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी बोलत आहे. रिनीने स्पष्ट केले की, त्या नेत्याने तिचे शोषण केले नाही. त्याने फक्त तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवले. त्या नेत्याने इतर अनेक महिलांना त्रास दिला आहे. हे तिला तिच्या मैत्रिणींकडून कळले असल्याने, ती त्यांच्यासाठी पुढे आली आहे.

हेही वाचा :

‘Bigg Boss 19’ या दिवशी होणार सुरु……
सट्टा लावणाऱ्याचा होणार धंदा बंद…भारतात Dream11 बॅन होणार! 
चाहत्यांना धक्का! अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय