स्थानिक क्रिकेटच्या 2025-26 च्या हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. रहाणेने आपली भूमिका मांडताना, “नवीन नेतृत्व तयार करण्याची ही योग्य वेळ आहे,” असं आपल्याला वाटत असल्याचं स्पष्ट केलं. मुंबई क्रिकेट(Cricket) असोसिएशन (एमसीए) ला लिहिलेल्या पत्रात, 37 वर्षीय रहाणेने कर्णधारपद सोडलं असलं तरी स्थानिक स्तरावरील खेळत राहण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

“मुंबई संघाकडून खेळताना कर्णधारपद भूषवणे आणि विजेतेपद पटकावणे हा एक सन्मान आहे,” असं रहाणेने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. “नवीन स्थानिक हंगाम येत असल्याने, मला वाटते की नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणूनच मी कर्णधार पदाची जबाबदारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मी खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि एमसीएसोबत माझा प्रवास सुरू ठेवेन जेणेकरून आम्हाला अधिक ट्रॉफी जिंकता येतील. हंगामासंदर्भात मी फार उत्सुक आहे,” असं रहाणेनं स्पष्ट केलं आहे.
रहाणेने 2023-24 मध्ये मुंबईला 42 व्या रणजी ट्रॉफी जेतेपद जिंकवून देत नऊ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. गेल्या दोन वर्षांत त्याचा अमर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील (Cricket)फॉर्म वाईट राहिला आहे. त्याने 27 डावात 467 धावा केल्या असून फक्त एका शतक झळकावलं आहे. मात्र अजिंक्य मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये उत्तम खेळतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, जेव्हा अजिंक्य श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळला होता, तेव्हा रहाणेनं हंगामात 469 धावा केल्या होत्या. त्याला त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
कर्णधार म्हणून, रहाणेने अलीकडेच आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्याने 14 सामन्यांमध्ये 147.27 च्या स्ट्राईक रेटने 390 धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. केकेआरसाठी अजिंक्यच्या नेतृत्वाखालील हंगाम फारसा चांगला राहिला नाही. केकेआरचा संघ फक्त पाच विजयांसह पॉइण्ट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर राहिला.

जुलैमध्ये, रहाणेने मला अजूनही खेळाची आणि रेड-बॉल क्रिकेटची ‘भूक आणि आवड’ आहे, असं स्पष्ट केलेलं. तो म्हणाला की, तो आगामी स्थानिक हंगामाची तयारी सुरू करण्यासाठी लंडनमध्ये सुट्टीवर असताना प्रशिक्षक आणि क्रिकेटचे साहित्य देखील घेऊन गेला होता.’स्काय स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांना “मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचे आहे,” असं रहाणेने सांगितले होते. “मला कसोटी क्रिकेट खेळण्याची खूप आवड आहे. मी सध्या माझे क्रिकेट एन्जॉय करत आहे. खरे सांगायचे तर, मी निवडकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या एक खेळाडू म्हणून मी नियंत्रित करू शकत नाही. मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,” असं अजिंक्य म्हणाला होता.
“एक खेळाडू म्हणून, मी फक्त क्रिकेट खेळत राहणे, खेळाचा आनंद घेत राहणे आणि प्रत्येक वेळी माझे सर्वोत्तम देणे एवढेच करू शकतो. मला कसोटी क्रिकेट खेळणे आवडते, लाल-बॉल क्रिकेट खेळणे आवडते, मला त्याची आवड आहे. खेळावरील प्रेम मला पुढे जाण्यास मदत करते,” असं अजिंक्यने सांगितलं होतं.
मुंबईचा संघ सध्या चेन्नई येथे होणाऱ्या बुची बाबू इन्व्हिटेशनल स्पर्धेत खेळत असून या माध्यमातून आगामी हंगामाची तयारी करत आहे. सध्या संघ 18 वर्षीय आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील तरुण संघ खेळत आहे. अलिकडेच, 2024-25 रणजी मोहिमेतील प्रमुख सदस्य असलेल्या मुंबईच्या अष्टपैलू शार्दुल ठाकूरला हंगामाच्या सुरुवातीच्या दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
रहाणेने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले: “मुंबई संघाकडून खेळताना कर्णधारपद भूषवणे आणि विजेतेपद पटकावणे हा एक सन्मान आहे. नवीन स्थानिक हंगाम येत असल्याने, मला वाटते की नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणूनच मी कर्णधार पदाची जबाबदारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मी खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि MCA सोबत माझा प्रवास सुरू ठेवेन जेणेकरून आम्हाला अधिक ट्रॉफी जिंकता येतील. हंगामासंदर्भात मी फार उत्सुक आहे.”
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2023-24 हंगामात 42 वी रणजी ट्रॉफी जिंकली, ज्यामुळे नऊ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपला. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्याची अमर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील (प्रथम श्रेणी) कामगिरी साधारण राहिली आहे. त्याने 27 डावांत 467 धावा केल्या, ज्यामध्ये फक्त एक शतक आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रहाणेने उत्तम कामगिरी केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने 469 धावा केल्या आणि त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित झाला.
हेही वाचा :
सट्टा लावणाऱ्याचा होणार धंदा बंद…भारतात Dream11 बॅन होणार!
‘भूतबाधा झालीये’…; तांत्रिक विधीचे नाटक करुन महिलेवर बलात्कार
व्हायरल Video: लहानग्याच्या हातात साप, पाहून कोब्रा समाजसुद्धा थरथर”