आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आता अवघ्या काही तासांनी आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाची अनुभवी जोडी या रँकिंगमधून बाहेर नाही तर थेट गायबच झाली आहे. या जोडीची एकाच आठवड्यात सारखीच स्थिती झाली आहे. आयसीसीच्या गेल्या आठवड्यातील बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित आणि विराट टॉप 5 मध्ये होते. मात्र ताज्या आकडेवारीत या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे.

रोहित-विराट रँकिंगमधून गायब

रोहित आणि विराट हे दोघेही वनडे रँकिंगमध्ये चांगल्या स्थितीत होते. दोघेही पहिल्या पाचात असल्याने क्रिकेट चाहतेही आनंदी होते. तेव्हा रोहित 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी होता. तर विराट चौथ्या क्रमांकावर होता. विराटच्या खात्यात तेव्हा 736 रेटिंग होते. विराट चौथ्या क्रमांकावर होता. मात्र आता हे दोघेही रँकिंगमध्येच नाहीत.