तुमच्या घरातील तुळस सुकायला लागली असेल, पाने पिवळी पडत असतील किंवा त्यावर पांढरी जाळी दिसत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुळशीचे रोप पुन्हा हिरवेगार आणि टवटवीत करू शकता.

भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. घराच्या अंगणात किंवा गॅलरीत लावलेली तुळस केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे, तर आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त मानली जाते. मात्र, अनेकदा योग्य काळजी घेऊनही तुळस सुकू लागते. (turning)यामागे कुंडीत साचणारे जास्त पाणी, अपुरा सूर्यप्रकाश, हवेतली जास्त ओलावा किंवा योग्य वायुविजनाचा अभाव आणि कीटकांचा प्रादुर्भाव ही मुख्य कारणे असतात.
तुळशीवर कीड दिसू लागली, विशेषतः पानांवर बारीक कीटक किंवा पांढरी जाळी दिसत असेल, तर कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले आणि थंड केलेले पाणी फवारल्याने मोठा फायदा होतो. हे नैसर्गिक कीटकनाशक असल्यामुळे झाडाला कोणतीही हानी न करता कीड नष्ट करते. (turning) त्याचप्रमाणे, हळदीचा वापरही उपयुक्त ठरतो. दर पंधरा दिवसांनी थोडी हळद कुंडीतल्या मातीत मिसळल्यास बुरशी होण्यापासून बचाव होतो आणि मुळे मजबूत होतात.जर कीड जास्त प्रमाणात असेल, तर लसूण आणि हिरवी मिरची वाटून तयार केलेले पाणी फवारल्यास त्याचा तीव्र वास कीटकांना दूर ठेवतो. याशिवाय, लाकडाची राख झाडाभोवती टाकल्याने मातीतील ओलावा संतुलित राहतो आणि कीटकांवरही नियंत्रण मिळते.
कीड नियंत्रणानंतर तुळशीला पुन्हा ताकद देण्यासाठी शेणखत किंवा गांडूळ खत देणे फायदेशीर ठरते. (turning) यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते आणि रोपाला आवश्यक पोषण मिळते. तुळशीला दररोज किमान चार ते पाच तास कोवळे ऊन मिळणे आवश्यक आहे. तसेच, कुंडीतली माती वरून कोरडी झाल्यानंतरच पाणी द्यावे, अन्यथा मुळे कुजण्याची शक्यता वाढते.या साध्या आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमची तुळस पुन्हा एकदा तजेलदार, हिरवीगार आणि सुगंधित ठेवू शकता.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान