मोबाईल रिचार्जचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एका कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळे रिचार्ज करावे लागल्यास महिन्याला मोठा खर्च येतो. (mobile) अशा परिस्थितीत ग्राहकांना दिलासा देणारी एक खास ऑफर सध्या चर्चेत आली आहे.

Reliance Jio कंपनीने कुटुंबासाठी फायदेशीर ठरणारा एक प्लॅन सादर केला आहे. अवघ्या 449 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्लॅनमध्ये एकाच कनेक्शनवर अनेक सदस्यांना सेवा मिळू शकते, (mobile)अशी माहिती समोर येत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाते.या प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डेटा शेअरिंग. एकूण 75 जीबी डेटा कुटुंबातील सर्व सदस्य वापरू शकतात. डेटा संपल्यानंतर अतिरिक्त डेटा घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र रिचार्ज करण्याची गरज राहत नाही.
याशिवाय, या प्लॅनमध्ये आणखी तीन सदस्यांना जोडण्याची मुभा दिली जाते. प्रत्येक अतिरिक्त सिमसाठी ठराविक शुल्क भरावे लागते. डिजिटल सेवांच्या बाबतीतही हा प्लॅन मागे नाही. JioTV आणि JioHotstar सारख्या सेवांचा लाभ ग्राहकांना मिळतो, तसेच क्लाऊड स्टोअरेजची सुविधाही दिली जाते. (mobile) तसेच, या प्लॅनसोबत प्रीमियम डिजिटल सबस्क्रिप्शनचा लाभ दिला जात असल्याचेही सांगितले जात आहे, ज्यामुळे मनोरंजन आणि डेटा स्टोरेज दोन्ही गरजा पूर्ण होतात. कुटुंबासाठी एकत्रित आणि किफायतशीर पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन आकर्षक ठरू शकतो.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान