जत तालुक्यातील बलात्कार व लूटमार प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत बुधवारी २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंते यांनी हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी मुनिर खुतबुद्दीन नदाफ याच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) व ३९२ (दरोडा/लूटमार) अंतर्गत गुन्हा दाखल होता. न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. (robbery) तसेच लूटमारीच्या गुन्ह्यात सात वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

आरोपीने भरलेली दंडाची रक्कम फिर्यादी महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. प्रकरणानुसार, २६ सप्टेंबर २०१९ रोजी पीडित महिला जत येथे जाण्यासाठी बसस्थानकावर थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिला जत येथे सोडण्याचे आमिष दाखवून आपल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये बसवले. (robbery)त्यानंतर निगडी गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्या कानातील सोन्याचे दागिने, साखळ्या, बुगड्या आणि मोबाईल हिसकावून घेतल्याची तक्रार पीडितेने जत पोलीस ठाण्यात दिली होती.
पीडित महिला व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती उज्वला करवते यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जी. मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी केला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी उपनिरीक्षक संजय कापुरकर, महिला पोलीस शिपाई रेखा खोत, सुनिता आवळे, सुप्रिया भोसले (robbery) तसेच जत पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार तुकाराम बंडगर यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?