आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून (unfortunate incident) पालापाचोळा जाळताना एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शंकर बापू चव्हाण (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘वडाचे नाव’ या शेतात घडली.

मॉन्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला असून धुळवाफ पेरणीपूर्वी शेत स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळा जाळण्याची कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शंकर चव्हाण हेही सकाळी आपल्या शेतात गेले होते. त्यांनी शेतातील सुकलेला पालापाचोळा एकत्र करून त्याला आग लावली. मात्र कडक उन्हामुळे ही आग अचानक भडकली आणि शेजारच्या शेताच्या बांधाकडे पसरू लागली.
शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून चव्हाण यांनी हातात झाडांची फांदी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत त्यांच्या पायाला ठेच लागून ते तोल जाऊन थेट आगीत पडले. मोठ्या आगीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला गंभीर भाजल्या गेल्या. त्या ठिकाणी तत्काळ मदत मिळाली नाही.
काही वेळाने त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार