मोठी बातमी! पेटीएमचा बँकिंग परवाना रद्द, आरबीआयने का केली कारवाई

Reserve Bank of India ने डिजिटल पेमेंट क्षेत्रातील मोठा निर्णय घेत Paytm Payments Bank Limited वर कठोर कारवाई केली आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ अंतर्गत या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून त्यामुळे ही संस्था भारतात कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास अपात्र ठरली आहे. (strict action) या निर्णयामुळे डिजिटल बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आरबीआयने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज सातत्याने नियमबाह्य आणि ठेवीदारांच्या हिताला बाधा आणणारे होते. बँकेच्या व्यवस्थापनावर विश्वासाचा अभाव, नियमांचे पालन न करणे आणि संभाव्य आर्थिक जोखीम यांसारख्या गंभीर मुद्द्यांमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला. ठेवीदारांचे हित सुरक्षित ठेवणे हेच या कारवाईमागचे मुख्य कारण असल्याचेही आरबीआयने नमूद केले आहे.

या घडामोडीनंतर बँकेने उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असून बँक कायमस्वरूपी बंद करण्याच्या प्रक्रियेसाठी आणि मालमत्ता विक्रीद्वारे ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी पुढील पावले उचलली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता असून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील विश्वास आणि नियमनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वीही आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले होते. २०२२ मध्ये नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली होती, तर २०२४ मध्ये खात्यात पैसे जमा करण्यावर मर्यादा आणण्यात आली होती. मात्र सुधारणा न झाल्याने अखेर परवाना रद्द करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. आता पुढील काळात या प्रकरणाकडे संपूर्ण वित्तीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक

 27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?