खिशाला कात्री, दूध दरात ९ रुपयांची वाढ; आजपासून नवे दर लागू

सप्टेंबर महिना सुरू झाला असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे.(prices) मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुट्या दुधाचे दर ९३ रुपयांवरून १०२ रुपये लिटर इतके झाले असून यामुळे ऐन सणासुदीच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत म्हशीच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे.

उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनुसार (prices) घाऊक दुधाचे दर प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये झाले आहेत. तर किरकोळ दर प्रति लिटर ११० रुपये इतका होण्याची शक्यता असल्याचे, ‘मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’ने म्हटले आहे.मागील वर्षभरात पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये दाणा, तूरचुणी, चणाचुणी, चारा आणि पेंड यांच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीच्या किमती देखील वाढल्या (prices) असून अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दुधाविरोधात कठोर कारवाई सुरू झाल्यानंतर बाजारात शुद्ध दुधाची मागणी वाढली आहे, या कारणांमुळे दूध दरात वाढ करण्यात आली आहे.गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यांसारखे मोठे सण सुरू होत आहेत. या सणासुदीच्या काळात दूध, दही, खवा, तूप आणि मिठाईची मोठी मागणी असते. मात्र दूध दराच्या वाढीमुळे याचा थेट परिणाम सणांच्या बजेटवर होणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय?

अजब पुण्यातील गजब प्रकार दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं भर रस्त्यात व्हिडीओ पाहून धक्काच बसेल?

“आम्हाला दान नको, नुकसानभरपाई द्या”महापुरानंतर नेपाळची भारत, अमेरिका अन् चीनकडे मागणी?