EPFO ची मोठी घोषणा लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी काढता येणार भरघोस रक्कम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी PF Advance म्हणजेच भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. (regarding) नव्या नियमांमुळे वैद्यकीय उपचार, शिक्षण, विवाह आणि घराशी संबंधित आर्थिक गरजांसाठी PFमधून रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. EPFOने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर याबाबत माहिती दिली आहे.

नव्या नियमानुसार, EPF सदस्यत्वाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या एकूण PF शिल्लकीच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. (regarding) यामध्ये कर्मचारी आणि नियोक्त्याचे योगदान तसेच त्यावरील व्याजाचा समावेश होतो. वैद्यकीय उपचारांसाठी स्वतःसाठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी PF Advance कितीही वेळा घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

स्वतःचे किंवा मुलांचे शिक्षण तसेच विवाहासाठीही PFमधून पैसे काढता येतात. शिक्षणासाठी सदस्यत्वाच्या कालावधीत कमाल १० वेळा, तर विवाहासाठी जास्तीत जास्त ५ वेळा PF Advance घेता येईल. घर खरेदी, बांधकाम, गृहकर्जाची परतफेड किंवा घराच्या नूतनीकरणासाठीही कमाल ५ वेळा पैसे काढण्याची सुविधा आहे. याशिवाय, विशेष परिस्थितीत एका आर्थिक वर्षात दोन वेळा PF Advance घेता येतो. नोकरी गेल्यास PF निधीतील ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. (regarding) त्यामुळे अचानक आर्थिक अडचणीच्या काळात PF खात्यातील निधी सदस्यांसाठी मोठा आधार ठरू शकतो.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?