ग्राहकांनो घरातून निघण्यापूर्वी आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद ?

आजपासून सरकारी बँकांचा 3 दिवसांचा संप सुरू झाला असून, पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. (employees) यामुळे गणेशोत्सवापूर्वी ग्राहकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. स्टेट बँक ते कॅनरा बँक सर्व सरकारी शाखा बंद राहतील, पण खासगी बँका व डिजिटल व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

आजपासून तीन दिवस बँकिंग सेक्टरसाठी बऱ्याच घडामोडींचा दिवस असणार आहे. देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने ही संपाची हाक दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे. पण त्यावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच बँक कर्मचारी संपावर गेल्याने तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठी अडचण होणार आहे.

या देशव्यापी बंदचा सर्वाधिक परिणाम सरकारी बँकांच्या कामकाजांवर होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टटे बँक ऑफ इंडियापासून पंजाब नॅशनल बँकेपर्यंतच्या सर्व सरकारी बँकांना टाळे लागलेले आहेत. (employees) त्याशिवाय बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन यूको बँकेसहीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्येही आजपासून तीन दिवस कामकाज ठप्प राहणार आहे. ब्रँचमध्ये कॅश जमा करणे, ड्राफ्ट बनवणे, पैसे काढण्यापासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. कर्जाशी संबंधित कामांवरही परिणाम झाला आहे. काऊंटरवर कोणतीच सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांना आल्या पावली घरी परतावे लागत आहे.

एकीकडे सरकारी बँकेमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. तर दुसरीकडे काही ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. देशातील सर्वच खासगी बँका संपापासून दूर आहेत. तुमचं बँक खातं एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, येस बँक वा इंडसइंड बँकेत असेल तर तुम्ही कोणतंही टेन्शन न घेता थेट या बँकांच्या शाखेत जाऊन तुमचे व्यवहार करू शकता. या खासगी बँकांची कामे नेहमी सारखी सुरळीत सुरू आहेत. काही खासगी बँकांमध्ये कर्मचारी संघटनांची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संपाचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. कोऑपरेटिव्ह बँकांची परिस्थिती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. स्थानिक कर्मचारी संघटनांच्या निर्णयावर कोऑपरेटिव्ह बँकांचे कामकाज अवलंबून आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोऑपरेटिव्ह बँकेत फोन करून बँक चालू आहे की नाही याची खात्री करूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा डीजिटल बँकिंग सेवांवर कोणताच परिणाम झालेला नाही. तुम्ही यूपीआय सेवा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगने तुम्ही घरी बसल्या व्यवहार करू शकता. एटीएम मशीनही सुरू आहेत. मात्र, कॅश रिफिलिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या कॅशची आवश्यकता असेल तर सावधगिरी बाळगा.

तीन दिवस बँकांचा संप असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा त्रास होणार आहे. उद्या 12 सप्टेंबर रोजी शनिवार आहे. हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. याचा अर्थ आता बँका थेट सोमवारी उघडणार आहेत. (employees) त्यामुळे ग्राहकांना आता डीजिटल माध्यमातूनच आपले आर्थिक व्यवहार उरकावे लागणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाचे ठिकठिकाणी पडसाद उमटताना दिसत आहेत. अमरावतीच्या राजकमल चौकात बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सरकारने आश्वासन पाळलं नाही. आरबीआय असो, इतर संस्था असतील किंवा राज्य सरकारचे कार्यालये असो या सर्व ठिकाणी पाच दिवसांचा आठवडा आहे. मग आम्हालाच पाच दिवसांचा आठवडा का नाही? असा सवाल बँक कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल, असा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?