वारणा नदीत कार कोसळली कठडा तोडून 20 फूट खाली पडली, चालक जखमी?

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वारणा नदीवरील निलेवाडी–ऐतवडे खुर्द पुलावर भीषण अपघात झाला. पुलाचा कठडा तोडून एक कार थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत कारचालक पृथ्वीराज चौगले (रा. अमृतनगर) जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. (accident) मिळालेल्या माहितीनुसार, कार (एमएच 09-9495) ऐतवडे येथून निलेवाडी-अमृतनगरच्या दिशेने निघाली होती. ऐतवडे खुर्द पुलावर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने पुलाचा कठडा तोडला आणि सुमारे 20 फूट खाली नदीपात्रात कोसळली. अपघातावेळी कारमधील एअरबॅग उघडल्याने चालकाचा जीव वाचला.

कार नदीपात्रात कोसळल्यानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी पृथ्वीराज चौगले यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, (accident) याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कार सरला हंबीरराव मोहिते यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली असून, अपघाताच्या कारणाचा अधिक तपास कुरळप पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?

हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?

शहरातील डीपी रोड, रिंग रोड खुले करा?