बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव मागील दोन – तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात होता. त्यामुळे काही भागात ऑगस्टच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, अनेक भागात पावसाची तूट आजही कायम आहे. राज्यातील वादळी पावसाचा प्रभाव ओसरला असून पुढील काही दिवस बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (monsoon) दरम्यान, भारतातील नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थानातून १९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

यंदा मोसमी पावसाच्या संपूर्ण हंगामावर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव आहे. तसेच पावसाचे प्रमाण असमान असल्याने राज्यातील बहुतांश भागात पावसाची मोठी तूट कायम आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राज्यातील काही भागांवर होता. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाची नोंद झाली. दरम्यान, हे क्षेत्र सध्या आग्नेय राजस्थान, लगतच्या गुजरात प्रदेशासह नैऋत्य मध्य प्रदेशातील काही भागात सक्रिय आहे. (monsoon) काही दिवसांपासून राज्याच्या उत्तर भागात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यामुळे काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, पाऊस थांबल्याने अनेक भागात उकड्यातही काहीशी वाढ नोंदली जात आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केला.
दुष्काळाची परिस्थिती अधिकच गडद होण्याची शक्यता – पश्चिम राजस्थानातून पावसाचा परतीचा प्रवास साधारण १७ सप्टेंबर सुरू होत असून १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस माघारी जातो.गेल्यावर्षी १४ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. संपूर्ण देशात पावसाच्या आकडेवारीनुसार १५ टक्के पावसाची तूट आहे. तर महाराष्ट्रात १६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. (monsoon) दरम्यान, सर्वदूर पावसाचा दीर्घकाळ अभाव राहिल्यास, राज्यात दुष्काळाची परिस्थिती अधिकच गडद होत जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?