भारतामध्ये ब्रिक्स शिखर परिषद होताच आता अमेरिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतावर शंभर टक्के टॅरीफ लावला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हालचालींना वेग आला आहे.

भारताने नुकतचं ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. या शिखर परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन देखील सहभागी झाले होते. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची धमकी या आधीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. अमेरिकन सीनेटने हे विधेयक गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी मंजूर केले होते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा कायदा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. (Donald Trump) आता लवकरच यावर मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जाणार आहे.
या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो. भारतासह चीनला देखील याचा मोठा फटका बसणार आहे.दरम्यान या विधेयकाला मंजुरी मिळाली तर जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. (Donald Trump) त्यामुळे भारत काय भूमिका घेणार? अशा स्थितीमध्ये रशियाकडून तेलाची खरेदी बंद करणार का? असा प्रश्न निर्माण होत होता, परंतु अखेर आता भारताची भूमिका समोर आली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवणार नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र जर दुसरीकडे अमेरिकेनं शंभर टक्के टॅरिफ लावलाच तर त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो.
अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावल्यास भारतीय वस्तू अमेरिकेत प्रचंड महाग होतील. यामुळे निर्यात प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते, ज्याचा थेट फटका हा देशाच्या जीडीपीवर होऊ शकतो. तसेच अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंची मागणी घटल्यामुळे याचा परिणाम काही विशिष्ट क्षेत्रांवर होऊ शकतो. त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. (Donald Trump) तसेच अशी परिस्थिती उद्भवल्यास परदेशी गुंतवणूकदार देखील सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?