झोपेत पाय लागल्याने तरुण भडकला; डोक्यात दगड घालून मजुराची हत्या, सोलापुरात खळबळ

सोलापुरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा जीव गेला (shocking incident) असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीनाक्षी नगर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे हा तरुण तेलगू शाळेजवळील मोकळ्या जागेत झोपला होता. त्याचवेळी आरोपी नागनाथ जवळकोठे देखील त्याच ठिकाणी होता. झोपेत असताना दोघांच्या पायांचा स्पर्श झाल्याने किरकोळ वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला हा वाद शिवीगाळपर्यंत मर्यादित होता, मात्र काही क्षणांतच त्याचे रूपांतर तीव्र भांडणात झाले.

या भांडणादरम्यान संतापाच्या भरात आरोपीने जवळच असलेला दगड उचलून महेशच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात महेश गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रकार इतक्या वेगाने घडला की आसपासच्या लोकांना हस्तक्षेप करण्याची संधीच मिळाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, दोघांनाही मद्याचे व्यसन होते आणि घटनेच्या वेळी ते नशेत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर किरकोळ कारणावरून वाद अधिक चिघळल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

तो सेक्स एडिक्ट होता, दिवसातला बराच वेळ फक्त IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या 17 दिवसांनी आरोपी अटकेत

1 मे पासून ‘या’ ऑनलाइन गेम्सवर बंदी; एक चूक अन् थेट कारवाई, कोणाला मिळणार सूट? सरकारचा मोठा निर्णय पाहा