रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली. पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या या निसर्गरम्य किनाऱ्यावर एक महाकाय व्हेल माशाचा मृतदेह (giant whale) पाण्यावर तरंगताना आढळून आला. सायंकाळच्या सुमारास काजीरभाटी किनाऱ्यालगत काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आली आणि पाहता पाहता परिसरात मोठी गर्दी जमली.

समुद्राच्या लाटांसोबत हा प्रचंड मृतदेह हळूहळू किनाऱ्याकडे सरकत असल्याने नागरिकांमध्ये कुतूहल आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि कांदळवन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता, व्हेल माशाचा मृतदेह अद्याप पाण्यातच असल्याने तो बाहेर काढणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट केले. भरतीच्या लाटांमुळे हा मृतदेह किनाऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या व्हेलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. समुद्रातील वाढते प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक कारणे यापैकी कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे सागरी जीवसृष्टीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, सागरी पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक
हेही वाचा
बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या 17 दिवसांनी आरोपी अटकेत