राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या नवी तारीख काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात आलाय. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर नव्याने सेट करण्याच्या मागणीबाबत आयोगाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. (exams) त्यामुळे मुख्य परीक्षा पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, ही विद्यार्थ्यांची मागणी कायम आहे.

प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर फेरतपासणी होईपर्यंत आयोगाला सांगून मुलाखती थांबविण्यात येतील, (exams) अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. मात्र आयोगाकडून अधिकृत परिपत्रक न आल्याने २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान नियोजित असलेल्या मुलाखतींबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी द्विधा मनःस्थिती होती.’मुलाखतीची तयारी करायची की मुख्य परीक्षेचा अभ्यास?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.

राज्यसेवा २०२५च्या मुलाखतींचा प्रश्न सुटला असला तरी, ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान नियोजित असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत अद्याप अस्पष्टता आहे. परीक्षेचे पेपर साधारण दोन महिने आधीच सेट केले जातात. आयोगाचे निलंबित अप्पर सचिव अभिजित लेंडवे याच्या वादग्रस्त कार्यकाळातच आगामी मुख्य परीक्षेचे पेपर तयार झाले असण्याची दाट शक्यता आहे. (exams) त्यामुळे या प्रक्रियेतही गैरप्रकार झाला नसेल कशावरून? त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?