संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकात आता ते कोणते खुलासे करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक येत असल्याची घोषणा त्यांनी एक्स माध्यमातून केली आहे. (political) त्यांनी आधी ‘नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी आर्थररोड कारागृहातील आपले अनुभव कथन केले आहेत. या नव्या पुस्तकात नेमके आता संजय राऊत कोणते धक्कादायक खुलासे करता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या पुस्तकाचे कव्हर पेज संजय राऊत यांनी एक्स माध्यमावर झळकवले आहे.

संजय राऊत यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांनी याआधी गुन्हेगारी विश्व, तसेच त्यांच्या दैनिक सामनातील लोकप्रिय सदरं रोखठोक, सच्चाई तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘फटकारे , एकवचनी (भाग १ आणि २), युगान्त, चेक मेट, हेप्सीचे वादळ, सुन्न करणारे दिवस, (political) अशी अनेक पुस्तके याआधी आली आहेत. मात्र, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थर रोड कारागृहात काढलेल्या १०४ दिवसांच्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेले ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांचे पुस्तक जास्त गाजले होते. आता त्यांचे नवीन पुस्तक ‘बोध किर्तन’ काय खळबळ माजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांचे तुरुंगातील दिवसांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले होते. त्यावेळी राजकारणात खळबळ उडाली होती. ईडी चौकशीचा ससेमिरा लागूनही राऊत यांनी न झुकता तुरुंगात जाणे पसंद केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये या पुस्तकाबद्दल अधिकच आत्मियता होती. या पुस्तकावर आधारित एक मुलाखत मध्यंतरी वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर घेतली होती. (political) त्यावेळी संजय राऊत यांनी तुरुंगात त्यांना घरातील जेवणाची जेव्हा परवानगी मिळाली त्यावेळचा अनुभव सांगितला आहे. हा डब्बा सतरा वेळा तपासला जात होता. त्यात त्यांच्या आईने सणाच्या दिवशी दोन लाडू पाठवले होते. ते लाडू देखील तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले होते असा अनुभव सांगितले होता. तसेच गुजरातचे गृहमंत्री अमित शाह यांना सोडवण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांकडे शिवसेना प्रमुखांनी शब्द टाकावा अशा केलेल्या विनंतीचाही गौप्यस्फोट केला होता.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?