राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट (women) पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ₹१,५०० जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होऊ शकते.

२४ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पैसे विश्वासू सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जाऊ शकतात. गणपती विसर्जनाच्या काळात निधी वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (women) त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, ही सध्या संभाव्य तारीख असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब ऑगस्ट महिन्याचा हप्ता याआधीच मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणाला उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. आता निधी वितरणाची प्रोसेस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. रक्कम पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
ई-केवायसी प्रोसेसनंतर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाख असल्याची माहिती समोर आली आहे. या पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येते आणि ती DBT द्वारे बँक खात्यात जमा केली जाते.ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. (women) आता ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याकडे महिलांचं लत्र लागलं आहे. २४ सप्टेंबरनंतर पैसे होण्याची माहिती समोर आली असली, तरी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित तारीख स्पष्ट होईल.
हेही वाचा :
UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?
‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?
भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?